Hingoli dist Maharashtra crimes political party

वसमतच्या उपनगराध्यक्षांना गोवंश प्रकरण भोवले,उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची शहरात चर्चा

वसमतच्या उपनगराध्यक्षांना गोवंश प्रकरण भोवले,उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची शहरात चर्चा

दिशा न्युज मराठी २४×७,वसमत 

मुख्य संपादक -गिरीष देशमुख 

 

वसमत शहरातील बहुचर्चित गोवंश प्रकरणाचे पडसाद आता राजकीय पातळीवर उमटु लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.दि. २९ जुलै रोजी वसमत येथील उपनगराध्यक्षांच्या शेतात पोलिसांनी छापा टाकुन १९ गोवंश जप्त केले होते.या प्रकरणानंतर सकल हिंदु समाज तसेच विरोधी पक्षांनी तीव्र आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला होता.

या प्रकरणी सकल हिंदु समाज व विरोधी पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.तसेच वसमत बंद पाळुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.विविध मागण्यांबाबत शासनाने दि. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत निर्णय घ्यावा,अन्यथा पुढे तिव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातुन देण्यात आला होता.

दरम्यान,या संपुर्ण प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीही गंभीर दखल घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर दि. ४ ऑगस्ट रोजी वसमत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष स.इम्रान अली नाशेर अली यांनी आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्षा सौ.सुनीता बाहेती यांच्याकडे सुपूर्त केल्याची माहिती समोर येत आहे.तसेच हा राजीनामा मंजुर झाल्याची माहिती निकटवर्तीय सुत्रांकडुन मिळत असल्याचे बोलले जात आहे.

मात्र,या राजीनाम्याबाबत नगर परिषद प्रशासन किंवा संबंधित पक्षाकडुन अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.त्यामुळे अधिकृत घोषणेनंतरच याबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement