Crime Editor Choice Hingoli police

हट्टा येथे १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार,तिघे आरोपी ताब्यात एका आरोपीचा शोध सुरु

हट्टा येथे १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार,तिघे आरोपी ताब्यात एका आरोपीचा शोध सुरु 

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन,त्यापैकी तीन आरोपींना हट्टा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.१३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान हट्टा परिसरातील शेतशिवारात,तळ्याजवळ ही घटना घडल्याचा आरोप आहे.

तसेच सुमारे १५ दिवसांपुर्वीही बालिकेसोबत अत्याचार झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

फिर्यादीच्या आरोपानुसार,तीन आरोपींनी सामाईक उद्देशाने बालिकेच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेत तिला बिस्कीट व ५० रुपये देण्याचे आमिष दाखविले.त्यानंतर तिला मोटारसायकलवरून नेऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय एका आरोपीने सुमारे १५ दिवसांपुर्वी बिस्कीट देण्याचे आमिष दाखवुन बालिकेवर अत्याचार केल्याचेही फिर्यादीत नमुद आहे.

या प्रकरणी १९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.१८ वाजता हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.भारतीय न्याय संहितेतील विवीध कलमा अंतर्गत व तसेच पोक्सो कायद्यातील कलम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन,एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप बोरकर करीत आहेत.पोक्सो कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement