वसमत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न,१०७ नागरिकांची तपासणी,२२ रुग्णांवर नांदेड येथे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईड,एसएमबी ग्रुप व कामगार कल्याण केंद्राचा संयुक्त उपक्रम
मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधुन एसएमबी ग्रुप, लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईड आणि कामगार कल्याण केंद्र,वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार,दि.१७ सप्टेंबर रोजी वसमत येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०७ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असुन,त्यापैकी २२ रुग्णांना मोतीबिंदु असल्याचे निदर्शनास आले.या सर्व रुग्णांवर नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालयात मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शिबिराचे उद्घाटन वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजुभैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजीराव बेंडे,राजुभैया नवघरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालुमामा ढोरे,माजी नगरसेवक मोबीन भाई, एसएमबी ग्रुपचे सय्यद गौस,कामगार कल्याण मंडळाचे साखरे साहेब,लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईडचे अध्यक्ष संजीवकुमार बेंडके,माजी अध्यक्ष राजु सिद्दिकी,उपाध्यक्ष मोहम्मद गौस बागवान,समीर कुरेशी,अंबादास मनी,प्रसाद लालपोतु,विजय लांडगु यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या सत्कारानंतर शिबिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडुन नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान २२ रुग्णांना मोतीबिंदु असल्याचे आढळुन आले.या रुग्णांना पुढील उपचारांसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले असुन,नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालयात त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
गरजु नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे आवश्यक : आमदार राजुभैया नवघरे
यावेळी बोलताना आमदार राजुभैया नवघरे यांनी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.समाजातील सर्वसामान्य आणि गरजु नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्था,उद्योग समुह आणि विविध संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“डोळे हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.अनेकदा आर्थिक अडचणींमुळे नागरिक नेत्र तपासणी किंवा मोतीबिंदूवरील उपचार पुढे ढकलतात.अशा नागरिकांपर्यंत मोफत तपासणी आणि उपचारांची सुविधा पोहोचविण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातुन होत आहे.२२ रुग्णांवर मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया होणार असुन,हा उपक्रम निश्चितच गरजू रुग्णांसाठी दिलासादायक आहे,”असे आमदार नवघरे यांनी नमुद केले.
भविष्यातही वसमत शहर व तालुक्यात अशा आरोग्यविषयक उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे आणि जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ मिळावा,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मसुद भाई यांच्या पुढाकारातुन आयोजन
एसएमबी ग्रुपचे सर्वेसर्वा मसुद भाई यांच्या पुढाकारातुन या शिबिराचे आयोजन करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी तसेच रिजवान भाई,सय्यद काशीद,सय्यद फैजान,सय्यद रेहान,शेख कामरान यांच्यासह एसएमबी ग्रुप,कामगार कल्याण केंद्र आणि लायन्स क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मस्के सर यांनी केले.लायन्स क्लब ऑफ वसमत प्राईडचे अध्यक्ष संजीवकुमार बेंडके यांनी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने भविष्यातही गरजु नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.














Add Comment