वसमत शहरात चाललंय तरी काय? नऊ दिवसांत दोन खुनांच्या घटनांनी खळबळ,दिवसा चोऱ्यांचे सत्र सुरूच
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
भरवस्तीत हत्या,ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून सोन्याच्या अंगठ्या लंपास कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता
वसमत शहरात मागील काही महिन्यांपासुन खुन,भरदिवसा चोरी,ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने लंपास करणे,तसेच सोशल मीडियावरील अफवांमुळे निर्माण होणारा तणाव अशा विविध घटनांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे.त्यातच १० सप्टेंबर रोजी युवकाच्या हत्येची घटना आणि १८ सप्टेंबर रोजी आणखी एका युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असुन,वसमत शहरात कायद्याचा धाक उरला आहे का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वसमत शहरातील शास्त्रीनगर परिसरात १० सप्टेंबर रोजी सकाळी भरदिवसा एका ७५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाची सुमारे ८० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी दोन अनोळखी व्यक्तींनी दिशाभुल करून हातचलाखीने काढुन घेतल्याची घटना घडली.
ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून अशा प्रकारे सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.विशेषतः सकाळच्या आणि दिवसाढवळ्या घडणाऱ्या या प्रकारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान,१० सप्टेंबर रोजी मध्यरात्री वसमत शहरात एका युवकाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती.पोलिस दप्तरी नोंदीनुसार,‘तु पोलिसांना माहितीची टीप का देतोस?’या कारणावरून तीन युवकांनी संबंधित युवकावर दगड व विटांनी हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.त्यानंतर अवघ्या नऊ दिवसांच्या कालावधीत आणखी एका युवकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने नागरिकांमधील चिंता अधिक वाढली आहे.
वसमत शहरातील तरुण अभिजीत शहाणे याचा मृतदेह १८ सप्टेंबर रोजी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पाठीमागील जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळुन आला.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असुन,मृत्युबाबत खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच हिंगोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा,अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना आणि वसमत उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडुन सुरू असुन,मृत्युमागील नेमके कारण आणि घटनेचे स्वरूप तपासातुन स्पष्ट होणार आहे.
वसमत शहरात अलीकडील काळात दिवसा चोरीच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे.काही महिन्यांपुर्वी एका आडत व्यापाऱ्याच्या दुकानातील गल्ल्यातुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपये लंपास केले होते.
त्यानंतर इपकलवार नगर भागातील सेवानिवृत्त शिक्षक उत्तम पवार यांच्या हातातील सोन्याची अंगठी ‘आम्ही पोलिस आहोत’असे सांगुन हातचलाखीने काढून घेण्यात आली होती.बहिर्जी कॉलेज परिसरातील या घटनेनंतर कौठा रोड परिसरातही सायंकाळच्या सुमारास एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातील अंगठी अशाच पद्धतीने काढुन घेण्यात आल्याची घटना घडली होती.
तसेच,२५ ऑगस्ट रोजी नगरपरिषद परिसरातील पिराणी यांच्या किराणा दुकानात रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.वसमत पोलिस वसाहतीच्या बाजुला भवानकर मॅडम यांच्या घराची दिवसा कडी तोडुन लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटनाही घडली होती.त्यानंतर जयनगर परिसरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातही भरदुपारी चोरी झाल्याचे समोर आले.
एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. विशेषतःज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हातचलाखीने काढुन घेण्याच्या प्रकारांमुळे चिंता अधिक वाढली आहे.
शास्त्रीनगर येथील ताज्या चोरीच्या घटनेतील आरोपी अद्याप अज्ञात असुन,पोलिस तपासातुन त्यांचा शोध लागतो का,तसेच शहरात यापुर्वी घडलेल्या अशाच घटनांशी त्यांचा काही संबंध आहे का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शहरात वारंवार घडणाऱ्या घटना खुन,चोरी,ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार या पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासनाने सतर्क राहुन ठोस उपाय योजना कराव्या अशी अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त होत आहे
वसमत शहरात नऊ दिवसांच्या कालावधीत समोर आलेल्या दोन खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.त्यातच भरदिवसा होणाऱ्या चोऱ्या,ज्येष्ठ नागरिकांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास करण्याचे प्रकार आणि इतर गंभीर घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या पार्श्वभुमीवर पोलिस प्रशासनाने गंभीर गुन्ह्यांचा तपास वेगाने पुर्ण करावा,चोरीच्या घटनांतील आरोपींचा शोध घ्यावा आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वसमत शहरातील नागरिकांच्या मनातील भिती कधी दुर होणार
वारंवार घडणाऱ्या या घटनांना आळा बसणार कधी? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिस प्रशासनाच्या कारवाईतुन मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त होत आहे.














Add Comment