वसमत येथील अभिजीत शहाणे खुन प्रकरणाचा ४८ तासांत छडा,तीन आरोपी जेरबंद
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत शहरातील बस स्थानकाजवळील जुना विश्रामगृह परिसरात झालेल्या अभिजीत रत्नाकर शहाणे (वय ३३ वर्षे,रा.सुवर्णकार कॉलनी,मालेगाव रोड,वसमत) यांच्या निर्घृण खुन प्रकरणाचा वसमत शहर पोलिसांनी केवळ ४८ तासांच्या आत छडा लावला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असुन,त्यांना २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी संजय प्रभाकर टाक (वय ४५ वर्षे, रा.साबणे गल्ली,शहरपेठ,वसमत) यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यांचे भाचे अभिजीत रत्नाकर शहाणे यांचा १७ सप्टेंबर दुपारच्या सुमारास,पाटबंधारे विभागाच्या जुन्या विश्रामगृहाच्या मागे अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून डोक्यात दगड मारून खुन केला होता.या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात भा.न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक श्री.डॉ.श्रेणिक लोढा,मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.कमलेश मीना,आणि मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.स्थागुशा श्री.भोसले,पोलीस निरीक्षक श्री.सुधीर वाघ आणि सपोनि एस.व्ही.डेडवाल यांनी तपासाची चक्रे फिरवली.
घटनास्थळावरून मिळालेले तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्वप्रथम संशयित जय (पिता सुनील थोरात) याला ताब्यात घेतले.त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता,या गुन्ह्यात अन्य दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले.पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत इतर दोन आरोपी गुलफराज यास बोल्डा येथुन तर रामेश्वर यास हैद्राबाद येथुन ताब्यात घेतले.तपासात जय सुनील थोरात,गुलफराज गुलशेर पठाण आणि रामेश्वर रमेश अडसुळे यांनी मिळुन हा खुन केल्याचे निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता,न्यायालयाने आरोपींची दिनांक २३/०९/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी (पी.सी.आर.) मंजुर केली आहे.सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असुन पोलीस त्यांची पुढील चौकशी करत आहेत
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा व पो.नी.सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डेडवाल,स्थागुशाचे पोउपनि जिव्हारे व त्यांचे पथक,तसेच वसमत शहर पोलीस स्टेशनच्या पथकातील संभाजी लकुळे,शेख जावेद,मात्रे,साहिल नय्यर,बाभळे,नितीन रामदिनेवार,संदीप सुरशे यांनी केली आहे.केवळ ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.














Add Comment