सार्वजनिक दसरा महोत्सव समितीची आमदार राजुभैया नवघरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपुर्ण बैठक संपन्न
दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन,उत्साहात व एकजुटीने दसरा साजरा करण्याचे आवाहन.
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत शहरातील सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ च्या आयोजनासंदर्भात सार्वजनिक दसरा महोत्सव समितीची महत्त्वपुर्ण बैठक सोमवार,दि. ६ ऑक्टोबर रोजी समितीचे अध्यक्ष तथा आमदार राजुभैया नवघरे यांच्या उपस्थितीत आमदार महोदयांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली.
आगामी दसरा महोत्सवाच्या नियोजनासह दहा दिवस आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
वसमत शहरात सार्वजनिक दसरा महोत्सवाची परंपरा गेल्या ४० वर्षांपासुन सुरू असुन,यंदाही हा उत्सव सर्व नागरिकांच्या सहभागातुन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्णय बैठकीत व्यक्त करण्यात आला.महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन,नागरिकांचा सहभाग,कार्यक्रमांच्या आयोजनातील आवश्यक बाबी तसेच उत्सवाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबाबत उपस्थित सदस्यांनी चर्चा केली.
बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार राजुभैया नवघरे म्हणाले की,“वसमत शहरात गेल्या ४० वर्षांपासुन सार्वजनिक दसरा महोत्सव आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे.यावर्षीही सर्वांनी एकजुटीने आणि आनंदाने हा महोत्सव साजरा करावा.महोत्सवाच्या आयोजनादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मला हाक द्या मी आपल्या सहकार्यासाठी सदैव तयार आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक दसरा महोत्सव हा शहरातील सर्व नागरिकांचा उत्सव असुन,विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन नागरिकांना एकत्र आणण्यासोबतच सामाजिक सलोखा व उत्सवी वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.दहा दिवस चालणाऱ्या महोत्सवातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी,सदस्य,कार्यकर्ते आणि नागरिकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या बैठकीस आमदार राजुभैया नवघरे,शिवदास बोड्डेवार, उपनगराध्यक्ष राजकुमार एंगडे,रवी बडवणे,सचिन दगडु,दीपक हाळवे,रत्नाकर अडसिरे,गणेश काळे,सिताराम मॅनेवार,शिवाजी अडलिंगे,प्रकाश शहाणे,तानाजी कदम,कन्हैया बाहेती,संकेत नामपल्ली,धिरज कुल्थे,प्रशांत लोखंडे,गिरीश देशमुख,राम साबणे,सुमाष भोपाळे,बालाजी अडकिने,नितीन वाघिले,धनंजय गोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी दसरा महोत्सव नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक तयारीला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सवाचा आनंद घ्यावा,असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.














Add Comment