Uncategorized

नगरसेविका डॉ.रेणुकाताई पतंगे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ मंडळीं सोबत वेळ घालवत साजरा.

वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत वेळ घालवत दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत 

वसमत नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या हिंगोली जिल्हाप्रमुख डॉ.रेणुकाताई पतंगे यांचा वाढदिवस ३० ऑक्टोबर रोजी सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त त्यांनी मौजे पळसगाव येथील ‘एक परिवार वृद्धाश्रमात’अन्नदान करून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाचे क्षण घालवले.

वाढदिवस म्हटला की केक कापणे,शुभेच्छांचा वर्षाव आणि आनंदोत्सव असे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते.मात्र,स्वतःच्या आनंदासोबतच समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याच्या उद्देशाने डॉ.रेणुकाताई पतंगे यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याचा निर्णय घेतला.

३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता त्यांनी वृद्धाश्रमाला भेट देत तेथील आजी-आजोबांची आस्थेने विचारपुस केली.त्यांच्यासोबत संवाद साधला तसेच अन्नदान करून सर्वांसोबत भोजनाचा आनंद घेतला.यावेळी बोलताना डॉ.रेणुकाताई पतंगे म्हणाल्या की,”वाढदिवस म्हणजे केवळ स्वतःसाठी आनंद साजरा करणे नव्हे,तर इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे होय.” याच भावनेतून वृद्धाश्रमात अन्नदान करून ज्येष्ठ नागरिकांसोबत वाढदिवस साजरा केल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनाही आनंदाचे क्षण अनुभवता आले.वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमातुन ज्येष्ठ नागरिकांप्रती आपुलकी,जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी साईनाथ पतंगे, पत्रकार रामु चव्हाण,डॉ.गजानन पतंगे,विनोद डरंगे,माधव सदगर,रमण पतंगे डिगांबर मुटकुळे यांच्यासह सहकारी मित्रपरिवार,शिवसेनेचे पदाधिकारी, महिला भगिनी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Featured

Advertisement

Advertisement