वसमत /तालुका प्रतिनिधी
दि.१४ एप्रिल रोजी वसमत येथील नामांकित असलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून त्यांच्या विचाराला आणि कार्याला अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव पंडितराव देशमुख सर होते,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.पी.जी.शेळके सर,पर्यवेक्षिका श्रीमती एस.व्ही.जाधव मॅडम,पर्यवेक्षक श्री.डी.आर बागल सर,पर्यवेक्षक श्री.के.बी.वायचाळ सर,तसेच प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे गणित विभाग प्रमुख श्री.बी.व्ही.कल्याणकर सर,तसेच इंग्रजी विभाग प्रमुख श्री एस.व्ही.पोटे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.सर्वप्रथम मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या विचाराला आणि कार्याला अभिवादन केले. व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पंडितराव देशमुख सर,मुख्याध्यापक श्री पी.जी.शेळके सर,तसेच प्रमुख वक्ते श्री बी.व्ही.कल्याणकर सर,श्री.एस.व्ही.पोटे सर या सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर अस्पृश्यता निवारण,दलित हक्क,महीला सक्षमीकरण तसेच कामगार कल्याणासाठी आयुष्यभर लढा दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीयांच्या शिक्षणाचा आणि मालमत्तेच्या हक्काचा पुरस्कार केला.असे विचार व्यक्त करून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला.या भीमजयंतीच्या निमित्ताने क्रिडाशिक्षक डी.एन.पाईकराव सरांनी एक सुंदर गीत सादर केले.या कार्यक्रमाचे संचलन संयोजिका श्रीमती ए.के.नादरे मॅडम यांनी केले.तसेच या कार्यक्रमाचे आभार श्रीमती एम.आर.वायचाळ मॅडम यांनी केले.या
कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
हु.बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी













Add Comment