Celebration Editor Choice Vasmat city

वसमत शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर आनंदात नाचत,गात वसमत शहरात भीम जयंती उत्साहात साजरी.
वसमत प्रतिनिधी.
दि.१४ एप्रिल रोजी वसमत शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नगर परिषदेतर्फे मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.यावेळी वसमत विधानसभेचे आमदार राजुभैया नवघरे,नगराध्यक्षा सौ.सुनीता बाहेती,उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली तसेच सर्वपक्षीय नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसमतच्या झेंडा चौक येथे उपनगराध्यक्ष इम्रान अली यांच्या वतीने गुत्तेदार हुसेन भाई व श्रीकांत भुमरे यांच्या सहकार्याने पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पंचायत समिती येथेही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला बीडीओ,ग्रामसेवक,कर्मचारी तसेच जयंती मंडळाचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
शहरातील बौद्ध वाडा जयंती उत्सव समितीच्या वतीने दीपप्रज्वलन करून जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास आमदार राजुभैया नवघरे व भिकू संघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.महिला भगिनींसह नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला.
बसस्थानक परिसरातील श्रीनाथ हॉटेल समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुरी-भाजी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी उत्तम मामा करवंदे व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
हर्षनगर येथील संबोधी बौद्ध विहार येथे आमदार राजुभैया नवघरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.तसेच त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले.
याशिवाय महात्मा फुले नगर येथील सार्वजनिक भीम जयंती मंडळातही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिक,महिला भगिनी व तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
वसमत शासकीय विश्रामगृह येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे व सर्व सन्माननीय नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
वसमत नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने कारखाना रोडवरील पाण्याच्या टाकी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्यावेळी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे.नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष सर्व सन्माननीय नगरसेवक,नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी साहेब.सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त झेंडा चौक येथे युवा सेना शहर प्रमुख विनायक सातपुते यांच्यातर्फे मठ्ठा वाटप करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement