Crime Editor Choice Hingoli dist

मोटारसायकल चोरास पकडून ०३ चोरीच्या मोटारसायकल जप्त,स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कारवाई.

मुख्य संपादक :
हिंगोली जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालुन चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत डॉ.नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार मोटारसायकल चोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दि.२५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की,आरोपी सतिष लक्ष्मण पोटे (वय १९ वर्षे,रा.जलाल धाबा,ता.औंढा नागनाथ) हा हिंगोली शहरातील काही चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्याच्या प्रयत्नात आहे.या माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगोली येथील कयाधु नदी पुलाजवळ नाकाबंदी करून आरोपीस ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने हिंगोली शहरातील विविध ठिकाणांहून ०३ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.त्यानुसार पोलिसांनी आरोपीकडून खालील मोटारसायकली जप्त केल्या :
MH38-T6065 हिरो कंपनीची मोटारसायकल
MH38-S7009 हिरो कंपनीची मोटारसायकल
विनाक्रमांक हिरो स्प्लेंडर मोटारसायकल
अशा एकूण सुमारे २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.तसेच हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले ०२ गुन्हे उघडकीस आणून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई डॉ.नीलाभ रोहन,पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे तसेच पोलीस अंमलदार भुजंग कोकरे,गजानन पोकळे,शिवाजी जालमिरे,साईनाथ कंठे,नरेंद्र साळवे,ज्ञानेश्वर गारे व हरिभाऊ गुजंकर यांच्या पथकाने केली.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement