Editor Choice Good working Hingoli dist

हिंगोली जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी-२०२६ उत्साहात संपन्न

मुख्य/संपादक
राज्यस्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धांसाठी हिंगोली जिल्हा संघ निवड चाचणी दि.२४ मे २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल,हिंगोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.आगामी राज्यस्तरीय स्पर्धा ७ वर्षाखालील मुले व मुलींसाठी दि.३० व ३१ मे २०२६ रोजी पुणे येथे.९ वर्षाखालील गटासाठी दि.२ जून २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे तसेच ११ व १३ वर्षाखालील गटांच्या स्पर्धा दि.५ ते ७ जून २०२६ दरम्यान सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धांसाठी हिंगोली जिल्ह्याचा संघ निश्चित करण्यासाठी निवड चाचणी घेण्यात आली.यावेळी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर,बुद्धिबळ संघटनेचे जिल्हा सचिव एम.ए.बारी उपस्थित होते.
निवड चाचणीचे आयोजन शेख रहीम सर,प्रकाश अडकिने सर (वसमत), तसेच हिंगोली येथील बेले सर व बजरंग कदम यांनी केले.या निवड प्रक्रियेस पालकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
निवड झालेले खेळाडू

७ वर्षाखालील मुली

१) जुनेरा फातिमा शेख मोहसीन

९ वर्षाखालील मुले

१) संभाजी शेळके
२) हर्ष साबळे

९ वर्षाखालील मुली

१) संस्कृती सोळंके

११ वर्षाखालील मुले

१) कार्तिक कैलास बेले

११ वर्षाखालील मुली

१) देवांशी नामदेव चापके
२) श्रद्धा शिवाजी साबळे

१३ वर्षाखालील मुले

१) जय नामदेव पवार
२) वेदांत विनोद कुंदर्गे
३) कुणाल शेळके
४) वेद रोहित देशपांडे
५) अहमद शेख मोहसीन
६) शिवराज सोळंके
निवड झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर व जिल्हा सचिव एम.ए.बारी यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बॉक्सिंग संघटनेचे जिल्हा सचिव फिरोज पठाण तसेच एकता फाउंडेशनचे संचालक गजानन आडे यांनीही खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement