Crime Editor Choice Maharashtra

पुर्णा येथे बेकायदेशीर गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत

पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक पोलिसांची धडक कारवाई
वसमत /तालुका प्रतिनिधी
शहरात अवैध अग्नीशस्त्राविरुद्ध मोठी कारवाई करत पूर्णा पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाला गावठी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसासह रंगेहात अटक केली आहे.ही कारवाई शनिवार,दि.२३ मे २०२६ रोजी करण्यात आली.महादेव उर्फ माधव शिवराम भंगे (वय २३,रा.कोळीवाडा,पूर्णा,जि.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,परभणीचे माननीय पोलीस अधीक्षक श्री.पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार पूर्णा पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते.पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की,कोळीवाडा भागातील महादेव भंगे हा तरुण आपल्या कमरेला बेकायदेशीर गावठी पिस्टल लावून उभा आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पूर्णा पोलिसांच्या पथकाने तातडीने सापळा रचुन संशयित ठिकाणी छापा टाकला.पोलिसांनी महादेव भंगे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता,त्याच्याकडे एक अवैध गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.पोलिसांनी सदर घातक शस्त्र जप्त केले असुन आरोपीविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१९/२०२६, कलम ३/२५ आर्म ॲक्ट (शस्त्र कायदा) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची यशस्वी कारवाई पूर्णा पोलीस ठाण्याचे माननीय पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील श्रीधर जगताप,श्री.जायभाये,मधुकर चट्टे,सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,जमीरोदिन फारोखी,सचिन भदर्गे,सय्यद उमर,महेश पांगरकर,प्रमोद पुरी,रफीयोद्दीन शेख,हनुमान ढगे आणि सायबर सेलचे गणेश कौटकर या सर्व टिमने केली आहे.या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement