Editor Choice Health & Fitness Hingoli dist

सुनेगावच्या महेश काळे यांचा वाढदिवस महाआरोग्य शिबीराने साजरा,समाजापुढे आदर्श निर्माण

सुनेगावच्या महेश काळे यांचा वाढदिवस महाआरोग्य शिबीराने साजरा,समाजापुढे आदर्श निर्माण

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक- गिरीष देशमुख 

वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव आणि जल्लोष नव्हे,तर समाजसेवेची संधीही असु शकते,हे सुनेगाव येथील शेतकरी कुटुंबातील युवक महेश गंगाधरराव काळे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.दरवर्षी सामाजिक उपक्रमातुन वाढदिवस साजरा करणाऱ्या महेश काळे यांनी दि.१२ जुलै रोजी आसेगाव सर्कलमधील नागरिकांसाठी मौ.आसेगांव ता.वसमत येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले.

या शिबिरात गावातील गरजु नागरिक,ज्येष्ठ नागरिक, महिला,युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.विविध आजारांची मोफत तपासणी,तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक सल्ला यांचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.

या समाजोपयोगी उपक्रमाला विविध क्षेत्रांतील राजकीय मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते,कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी,वैद्यकीय तज्ज्ञ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी महेश काळे यांच्या समाजाभिमुख विचारांचे आणि सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत,अशा उपक्रमांतुन युवकांनी समाजकार्यात पुढे यावे,असे आवाहन केले.

साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या महेश काळे यांनी वाढदिवसाचा आनंद समाजाच्या सेवेशी जोडुन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक गरजु नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला असुन,परिसरात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्या निम्मित उपस्थित मान्यवर विकास माने सर उपविभागीय अधिकारी वसमत सारंग चव्हाण तहसीलदार वसमत डॉ.विनोद डोणगावकर नायब तहसीलदार वसमत अमोल इंगळे,परमेश्वर गरुड,तानाजी भोसले सर कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवराव दादाराव काळे,कार्यक्रमाचे मार्गदर्शक मंचकराव काळे,दत्तराव काळे,दत्ता किशन काळे,अमोल मुळे,गजानन मोरे,विठ्ठल कोरडे,बालाजी मोरे,गजानन पप्पलवाड आणि सर्कल मधील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement