स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत अवैध वाळु वाहतुक करणारा हायवा टिप्पर जप्त,२० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख
हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळु वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी दि.११ जुलै धडक कारवाई करत पोलीस ठाणे आखाडा बाळापुर हद्दीतील मौजे वरुड तांडा शेतशिवारातील रस्त्यावरून अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारा हायवा टिप्पर जप्त केला. या कारवाईत एकूण २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैध वाळु वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचुन ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनातुन कोणतीही वैध परवानगी न घेता गौण खनिजाची वाहतुक होत असल्याचे आढळुन आले.
याप्रकरणी संबंधित वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) तसेच गौण खनिज अधिनियम कलम 48(7) व 48(8) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्यासह भुजंग कोकरे,शिवाजी जालमीरे,हरिभाऊ गुंजकर,आजम प्यारेवाले,किशोर सावंत,विशाल खंडागळे व शंकर हराळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.
जिल्ह्यात अवैध वाळु उत्खनन व वाहतुकीविरोधात अशी धडक कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.














Add Comment