Celebration Editor Choice Education

वसमत येथील हु.बहिर्जी स्मारक विद्यालयात देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

वसमत येथील हु.बहिर्जी स्मारक विद्यालयात देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

दि.१५ ऑगस्ट रोजी वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.जी.शेळके सरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या ध्वजारोहणाला हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव पंडितराव देशमुख सर,माजी मुख्याध्यापक तथा संस्थेचे कार्यकारी अधिकारी बी.एस. खिल्लारे सर,श्री.गुजराथी सर,माजी मुख्याध्यापक एन.एस.जाधव सर,माजी मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम,हु.बहिर्जी स्मारक विद्यालयाचे प्राथमिक चे मुख्याध्यापक डी.आर.इंगळे सर,विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक,सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षिका या सर्वांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.या स्वातंत्र दिनाच्या सोहळ्यामध्ये.विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत,लेझीम, देशभक्तीपर गीते,विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.विद्यालयाच्या वतीने वसमत शहरातुन उत्स्फुर्तपणे प्रभात फेरी काढण्यात आली.विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्ये देशभक्ती,राष्ट्रीय एकात्मता,आणि स्वातंत्र्याच्या मुल्य विषयी जनजागृती केली.मोठ्या प्रमाणात असलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह,देशभक्तीपर घोषणांनी,आणि तिरंग्याच्या आकर्षक सजावटीने वसमत परिसर भारावुन गेला.स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना संविधानिक मुल्ये, शिस्त,एकता आणि देशप्रेम जोपासण्याचे आव्हान करण्यात आले.या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.जी.शेळके सर,उपमुख्याध्यापक श्री.जी.आर.आरकिलवाड सर,पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही.जाधव मॅडम,पर्यवेक्षक श्री.डी.आर.बागल सर पर्यवेक्षक श्री.के.बी.वायचाळ सर आणि विद्यालयातील सर्व शिक्षक बंधु,भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग,शालेय क्रीडा विभाग,शालेय कला विभागाने परिश्रम घेतले.

Featured

Advertisement

Advertisement