इंदुरा सी.बी.एस.ई.शाळेत विद्यार्थी संसद स्थापन.
शाळेच्या नवनवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जिवनात अनुभवांची भर.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत तालुक्यातील इंदुरा सी.बी.एस.ई.शाळेत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण,शिस्त,जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मुल्ये रुजविण्याच्या उद्देशाने विद्यार्थी संसद स्थापन करण्यात आली.
इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी संसदेतील विविध १८ पदांसाठी निवडणुक घेण्यात आली.या निवडणुकीत एकुण ६१ विद्यार्थी उमेदवार रिंगणात होते.उमेदवारांनी निवडुन आल्यास शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम राबविणार,याबाबत आपले विचार मांडले.त्यानंतर ६ वी ते १० वीच्या एकुण ४१७ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
निवडणुकीत विजयी झालेल्या १८ विद्यार्थ्यांना निष्ठा व प्रामाणिकपणाची शपथ देऊन पददान करण्यात आले. वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.उमाकांत पुणे यांच्या हस्ते हा पददान व शपथविधी सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव कैलास पानखडे सर यांनी केले. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना विद्यार्थी संसदेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त,जबाबदारी,नेतृत्वगुण आणि लोकशाही पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल,असे त्यांनी सांगितले. लोकशाहीची मुल्ये केवळ पुस्तकातुन न शिकता अशा उपक्रमांच्या माध्यमातुन प्रत्यक्ष अनुभवता येतात,असेही त्यांनी नमुद केले.
सहायक पोलीस निरीक्षक श्री.पुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांनी शिस्त अंगी बाळगुन देशाचे आदर्श नागरिक बनावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.इंदुरा सी.बी.एस.ई.शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचेही त्यांनी सांगितले.
पददान समारंभानंतर इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या २० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.श्रावणी ढोरे व कु.वैष्णवी दळवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांसह उपप्राचार्य खाकरे सर,प्राचार्य तांबारे सर व पवार सर यांनी विशेष परिश्रम घेतले.क्रीडा शिक्षक श्री.निसार सर व श्री. गायकवाड सर यांनी शालेय शिस्तीचे नियोजन केले.कु.पुजा गुड्डलवार यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेकडुन राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक करून समाधान व्यक्त केले.














Add Comment