Hingoli dist Maharashtra Social work

हट्टा येथे ईद मिलन व शीरखुर्मा पार्टी उत्साहात संपन्न.

हट्टा ता.वसमत (प्रतिनिधी)
हट्टा येथे दि.२७ मार्च रोजी रिलॅक्स ट्रेडिंग कंपनी येथे ईदनिमित्त आयोजित करण्यात आलेली ईद मिलन व शीरखुर्मा पार्टी मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाली.गावातील विविध समाजघटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुता,ऐक्य आणि सौहार्दाचा संदेश दिला.विशेषतः शीरखुर्मा व इतर पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत उपस्थितांनी स्नेहसंमेलनाचा मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक एकात्मता आणि परस्पर सलोखा वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.विविध मान्यवरांनी उपस्थित राहून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार शेख सादिक शेख जिलानी,शेख मैनुद्दीन आणि शेख हबीब यांनी केले होते.त्यांच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी मुनीर पटेल,लक्ष्मीकांत देशमुख,शेख सैनोदिन बाळासाहेब,सरपंच दीपक हातागळे,पुष्पक देशमुख,विजय चव्हाण,मैनोदि्न आणि गणेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या ईद मिलन सोहळ्यामुळे गावात आनंद,एकोपा आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले असून,सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement