Maharashtra Social work Vasmat city

वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया भैया बाहेती यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया भैया बाहेती यांचा वाढदिवस उत्साहात साजरा,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी

वसमत /तालुका प्रतिनिधी

वसमत नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया भैया बाहेती यांचा वाढदिवस दि.८ मे रोजी अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून बाहेती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

आमदार राजूभैया नवघरे यांच्याकडून शुभेच्छा

वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांनी कन्हैया भैया बाहेती यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाहेती यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना दीर्घायुष्य लाभो,अशी सदिच्छा आमदारांनी व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक राजकुमार ऐंगडे,नगरसेवक धनंजय गोरे,युवा नेते सौरभ जाधव आणि शहराध्यक्ष भीमराव सरकटे उपस्थित होते.तसेच शहर उपाध्यक्ष विनोद भाऊ चव्हाण, शासकीय गुत्तेदार अमित कुमार काबरा आणि वसीम कुरेशी यांनीही उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.

प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील स्नेह

वाढदिवसानिमित्त माऊली बेंडे, उपनगराध्यक्ष इम्रान अली यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी बाहेती यांचे अभिनंदन केले.विशेष म्हणजे, नगरपालिकेतील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कन्हैया भैयांना शुभेच्छा दिल्या.यामुळे बाहेती यांचा सर्व स्तरातील लोकांशी असलेला जिव्हाळा दिसुन आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस विशेष उत्साहात साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमामुळे वसमत शहरात बाहेती यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement