Editor Choice Maharashtra Vasmat city

वसमतचे आमदार राजुभैय्या नवघरे यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे कार्यकर्त्यांची जोरदार मागणी.

वसमतचे आमदार राजुभैय्या नवघरे यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे कार्यकर्त्यांची जोरदार मागणी.
वसमत / तालुका प्रतिनिधी
वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजुभैया नवघरे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे,अशी मागणी आता मतदारसंघातील कार्यकर्ते व समर्थकांकडुन जोर धरू लागली आहे.गेल्या अनेक दिवसांपासुन त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चांना उधाण येत असुन,आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरपंच ते आमदार असा प्रेरणादायी प्रवास असलेल्या राजुभैया नवघरे यांनी स्थानिक पातळीपासुन आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले.सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणुन निवडुन येत त्यांनी मतदारसंघात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.युवा वर्गात असलेली त्यांची लोकप्रियता ही पक्षासाठी मोठी जमेची बाजु मानली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटातील निष्ठावंत आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणुन राजुभैया नवघरे यांची ओळख आहे.कार्यकर्त्यांमध्ये अशीही चर्चा आहे की,यापूर्वी वसमत येथील एका जाहीर सभेत स्व.अजितदादा पवार यांनी भविष्यात“राजुभैय्यांना केवळ आमदार नाही तर मंत्री करणार”असे संकेत दिले होते.
दरम्यान उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात राजुभैया नवघरे यांचा समावेश करावा,अशी मागणी कार्यकर्त्यांकडुन अधिक जोर धरत आहे.राजुभैया यांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे हिंगोली जिल्हा व मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल,असा विश्वास समर्थक व्यक्त करत आहेत.
वसमत येथील सभेत दिलेला शब्द पक्ष नेतृत्व खरा करणार का,याकडे आता वसमत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement