Editor Choice Maharashtra Social work

वसमत नगरपरिषद प्रभाग १३ च्या समस्या बाबत,वृत्तपत्रामधे बातम्या प्रसिद्ध होताच,नगराध्यक्ष प्रतिनिधी ‘ॲक्शन मोड’वर

वसमत/तालुका प्रतिनिधी
वसमत नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील मूलभूत सोयी-सुविधांचा बोजवारा उडाल्याची बातमी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध होताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.या बातमीची दखल घेत वसमत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुनिताताई बाहेती यांचे प्रतिनिधी तातडीने’ॲक्शन मोड’वर आले असुन त्यांनी प्रभागात प्रत्यक्ष उतरून कामाला सुरुवात केली आहे.मात्र,दुसरीकडे संबंधित प्रभागाचे नगरसेवक चक्क गायब झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे सविस्तर वृत्त?
वसमत नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासुन कचऱ्याचे ढीग,तुंबलेल्या नाल्या,स्वच्छतेचा अभाव आणि इतर मुलभूत गरजांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती.वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत होत्या.या गंभीर समस्येवर प्रसारमाध्यमांनी प्रकाश टाकताच नगरपरिषद प्रशासनाचे धाबे दणाणले.
नगराध्यक्षा सौ.सुनीताताई बाहेती यांचे प्रतिनिधी मैदानात उतरले असुन
प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक गायब झाल्याच्या चर्चा नागरिकांकडुन ऐकायला मिळत आहे.
प्रसार माध्यमांमध्ये बातम्या झळकताच नगराध्यक्ष प्रतिनिधींनी तात्काळ प्रभाग क्रमांक १३ ला भेट देऊन स्वच्छता मोहिमेचे आदेश दिले आणि स्वतःउपस्थित राहून कामे करून घेतली.मात्र,ज्या नगरसेवकाला जनतेने निवडून दिले,ते नगरसेवक मात्र प्रभागातील समस्येच्या वेळी चक्क गायब असल्याचे पाहायला मिळाले.
नगरसेवकाच्या या बेजबाबदारपणामुळे नगराध्यक्ष प्रतिनिधींनाच स्वतः प्रभागात येऊन नगरसेवकाचे काम करावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लोकप्रतिनिधींच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधीचा पत्ता नसल्याने प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांमध्ये गायब असलेल्या नगरसेवकाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.”निवडणुकीपुरते मत मागायला येणारे नगरसेवक संकट काळात कुठे लपले आहेत?”असा संतप्त सवाल स्थानिक महिला व नागरिकांनी उपस्थित केला आहे.नगराध्यक्ष प्रतिनिधींच्या तत्परतेचे स्वागत होत असले,तरी गायब नगरसेवकांमुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement