धार्मिक कार्यक्रमासाठी लवकरच मंदिर परिसराची स्वच्छता करून देणार व वसमत शहरातील नागरिकांच्या मुलभूत सेवेसाठी तत्पर राहणार,नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती
मुख्य संपादक | वसमत
दि.२७ मे रोजी वसमत येथील प्रभाग क्रमांक १३ मधील ईपकलवार नगर भागात आगामी धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली.नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून,परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
धोंडेजेवण व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन
ईपकलवार नगर परिसरातील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे येत्या २९ मे रोजी भव्य’धोंडेजेवण’आणि’महाप्रसाद’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्यासाठी शहरातून आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिर परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक होते.
नागरिकांची मागणी आणि बाहेतींची तत्परता
भाविकांची गैरसोय होऊ नये आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी मंदिर परिसरात स्वच्छता व नालेसफाई करण्यात यावी, अशी मागणी ईपकलवार नगर मधील नागरिकांनी नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती यांच्याकडे केली होती.नागरिकांच्या समस्येची आणि या धार्मिक कार्यक्रमाच्या महत्त्वाचे गांभीर्य ओळखून कन्हैया बाहेती यांनी तात्काळ पावले उचलली.
कर्मचाऱ्यांकडून काम सुरु पूर्ण स्वच्छतेचे आश्वासन
बाहेती यांनी तात्काळ नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्यांना ईपकलवार नगर भागात पाचारण केले.त्यांच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांनी तातडीने मंदिर परिसरात नालेसफाई आणि स्वच्छतेचे काम सुरू केले आहे.केवळ तात्पुरती स्वच्छता न करता, संपूर्ण परिसराची पूर्णपणे स्वच्छता करून दिली जाईल,असे आश्वासनही कन्हैया बाहेती यांनी यावेळी नागरिकांना दिले.
नागरिकांनी मानले आभार
ऐन धार्मिक कार्यक्रमाच्या तोंडावर कन्हैया बाहेती यांनी दाखवलेल्या या कार्यतत्परतेमुळे आणि सहकार्यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या वेळेवर मिळालेल्या मदतीबद्दल प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती यांचे मनस्वी आभार मानण्यात आले आहेत.














Add Comment