वाशिम जिल्ह्यात महामार्गावर तब्बल पाच तास नाकाबंदी करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमनुरी येथील खुन प्रकरणातील फरार दोन आरोपींना केली अटक.
मुख्य संपादक:
पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत दि.२२ मे २०२६ रोजी शुक्रवारी सायंकाळी ०७ वाजण्याच्या सुमारास साईनगर परिसरातील खुल्या मैदानात एका युवकाच्या डोक्यात दगड घालून ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला चार आरोपींना अटक केली होती,मात्र दोन मुख्य आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी वाशिम-अकोला महामार्गावरून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ वाशिम जिल्ह्यात महामार्गावर नाकाबंदी केली.या कारवाईत फरार आरोपी
१) आकाश विठ्ठल सातव (वय २८,रा.पाटील गल्ली,कळमनुरी)
२) भरत शंकरलाल यादव (वय २५ रा.साईनगर,कळमनुरी)
यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन कळमनुरी येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन,पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे,पोउपनि माधव जीवारे तसेच पोलीस अमलदार गजानन पोकळे,सतीश जाधव,शिवाजी जाल्मिरे आणि हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने पार पाडली.














Add Comment