Articles Editor Choice Maharashtra

शब्द शब्द तुझाच आहे…’ काव्यसंग्रहाचा ०७ जून रोजी नांदेडमध्ये भव्य प्रकाशन सोहळा…

शब्द शब्द तुझाच आहे…’ काव्यसंग्रहाचा ७ जून रोजी नांदेडमध्ये भव्य प्रकाशन सोहळा…

मुख्य संपादक:वसमत

ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव अध्यक्षस्थानी,साहित्य,प्रशासन व न्याय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…

नांदेड : संदीप महाजन

प्रसिद्ध साहित्यिक तथा छत्रपती संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त निलेश शेवाळकर लिखित‘शब्द शब्द तुझाच आहे…’या बहुचर्चित काव्यसंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा रविवार दि.७ नांदेड येथे संपन्न होणार आहे.साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा हा सोहळा सकाळी १० वाजता सायन्स कॉलेजमधील स्व.पुरणमलजी लाहोटी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मराठी कवी,साहित्यिक आणि व्याख्याते इंद्रजित भालेराव राहणार आहेत.त्यांच्या साहित्यिक उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष वैचारिक उंची लाभणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक,छत्रपती संभाजीनगरचे अपर राज्यकर आयुक्त अभिजित राऊत,नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर,नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे निवृत्त अर्थशास्त्र विभाग प्रमुख रामकृष्ण सोळंके तसेच ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मुंबईस्थित’ग्रंथाली प्रकाशन’यांनी या काव्यसंग्रहाची निर्मिती केली असून,पुस्तकातील कविता मानवी भावविश्व,नात्यांची संवेदनशीलता आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा प्रभावीपणे मांडणाऱ्या असल्याची साहित्य वर्तुळात चर्चा आहे.
साहित्य,प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन निलेश वसंतराव शेवाळकर आणि शेवाळकर परिवारातर्फे करण्यात आले आहे

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement