Crime Editor Choice Maharashtra

वसमत सत्र न्यायालयाकडुन सिताबाई गाडेकर यांना जामीन मंजुर

ॲड.ज्ञानेश परडे यांचा युक्तिवाद ग्राह्य

मुख्य संपादक: गिरीष देशमुख

वसमत शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ३१६/२०२६ मधील आरोपी सिताबाई रामराव गाडेकर (वय ६६ वर्षे,रा.जयनगर,वसमत) यांना वसमत येथील माननीय अतिरिक्त सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजुर केला आहे.
मृत्यू प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम १०३ व २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात आरोपी सिताबाई गाडेकर यांच्या वतीने ॲड.ज्ञानेश गोविंदराव परडे यांनी सविस्तर युक्तिवाद केला.त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की,प्रथमदर्शनी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार अर्जदार महिलेचा कथित हल्ल्याशी कोणताही प्रत्यक्ष संबंध दिसुन येत नाही.फिर्याद व तपासातील सामग्रीनुसार त्या घटनास्थळी उपस्थित नसून त्यांच्याविरुद्ध केवळ चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ॲड.परडे यांनी पुढे असा युक्तिवाद केला की,अर्जदार या ६६ वर्षीय वृद्ध महिला असुन त्यांना कोणताही गुन्हेगारी पूर्वइतिहास नाही.त्यांच्याकडून कोणतीही जप्ती अथवा पुढील चौकशी शिल्लक नसून तपासासाठी त्यांचा कोठडीतील ताबा आवश्यक नाही.तसेच त्यांच्याविरुद्ध लागु होणारा मुख्य आरोप हा जामीनपात्र स्वरूपाचा असल्याचेही न्यायालयासमोर मांडण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व उपलब्ध नोंदींचा विचार करून माननीय अतिरिक्त सत्र न्यायालयाने सिताबाई गाडेकर यांचा जामीन अर्ज मंजूर केला.न्यायालयाने आवश्यक अटी व शर्तींसह त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात अर्जदारांच्या वतीने ॲड.ज्ञानेश गोविंदराव परडे यांनी कामकाज पाहिले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement