Editor Choice Hingoli dist Hingoli police

हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या व जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्त्या.

मुख्य संपादक: गिरीष देशमुख

दि.४ जून रोजी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असुन नव्याने जिल्ह्यात रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनाही विविध ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२(न)(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून तसेच हिंगोली जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आणि पोलीस प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
संदीप मोदे – पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथुन जिल्हा विशेष शाखा,हिंगोली येथे.
देवेंद्रसिंह ठाकूर – पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे नियुक्ती.
विष्णुकांत गुट्टे – पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर येथून पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे.
श्यामकुमार डोंगरे – पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथून पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथे.
प्रेमप्रकाश माकोडे – पोलीस स्टेशन कळमनुरी येथून पोलीस नियंत्रण कक्ष,हिंगोली येथे.
जमीर नाईक – जिल्हा विशेष शाखा,हिंगोली येथून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे.
शरद मरे – शहर वाहतूक शाखा,हिंगोली येथून पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर येथे.
शेख गफार शेख जमील – पोलीस नियंत्रण कक्ष,हिंगोली येथून शहर वाहतूक शाखा,हिंगोली येथे.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
रामदास निरदोडे – पोलीस स्टेशन कुरुंदा येथून पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे.
महादेव पुरी – पोलीस स्टेशन कुरुंदा येथे नियुक्ती.
संग्राम जाधव – पोलीस स्टेशन हट्टा येथून पोलीस स्टेशन वसमत शहर येथे.
संदीप बोरकर – पोलीस स्टेशन हट्टा येथे नियुक्ती.
उमाकांत पुणे – पोलीस स्टेशन कळमनुरी येथे नियुक्ती.
आयुब शेख – पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथे नियुक्ती.
वसंत आरसेवार – सायबर पोलीस स्टेशन तथा स्थानिक गुन्हे शाखा,हिंगोली येथे नियुक्ती.
हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील अधिकारी तसेच नव्याने जिल्ह्यात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांच्या या बदल्यांमुळे पोलीस प्रशासनात नवीन जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे,गुन्हे प्रतिबंधक कारवाईला गती देणे आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा देणे या दृष्टीने या बदल्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement