Editor Choice Social work Vasmat city

वसमत शहर व गणेश पेठ भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला भाजपाचे निवेदन

मुख्य संपादक : गिरीष देशमुख
वसमत शहरातील पोलीस क्वार्टर डीपी अंतर्गत येणाऱ्या गणेश पेठ परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करण्यात यावा,तसेच वसमत शहरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीजखंडितीच्या समस्येतुन दिलासा मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दि.६ जुन रोजी महावितरण कार्यालयात निवेदन सादर केले.
गणेश पेठ व परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक,व्यापारी व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.कमी दाबाचा वीजपुरवठा,अचानक खंडित होणारी वीज आणि वाढता भार यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली.त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी नवीन डीपी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) बसविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपा कपिश्वर साखर कारखाना बाराशिव अध्यक्ष आतिश भैय्या दांडेगावकर,शहराध्यक्ष विष्णु बोचकरी,माजी नगराध्यक्ष विजय कडतन,प्रा.गणेश कमळू,सिताराम म्यानेवार,शिवाजी अलडिंगे,अमोल मुळे,रफियोदिन अहमद शमशुद्दीन मोदी,अविनाश गायकवाड,राजेश भालेराव,पांडुरंग देसाई,रवी सूर्यवंशी,संजय काकडे,भारत स्वामी,बंडु बोबडे,गंगाप्रसाद सातपुते,बाळासाहेब लोखंडे,कृष्णा भालेराव,बालाजी कासार,गजानन चौडेकर,शेख मोईन व विष्णू शहाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महावितरण प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement