वसमत तालुक्यात ओबीसी आरक्षणावर गदा अन्यायाविरोधात आंदोलनाचा इशारा
अनेक ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षण शुन्य,आरक्षणाचा प्रश्न निकाली न लागल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकणार.
दिशा न्युज मराठी २४×७, मुख्य संपादक: गिरीष देशमुख
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसमत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणात कपात करण्यात आल्याचा आरोप करत सर्व ओबीसी समाज आणि विविध ओबीसी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या संदर्भात मुख्यमंत्री,राज्य निवडणुक आयोग,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह संबंधित प्रशासनाला सोमवार दि. २२ निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदना दिलेल्या माहितीनुसार,वसमत तालुक्यातील सिरळी, कूपटी,खांबाळा,राजवाडी,मरसुळ, डोनवाडा,सुकळी,म्हातारगाव,गुंज तर्फे आसेगाव या गावांमध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक असतानाही संबंधित ग्रामपंचायतींच्या काही वॉर्डांमध्ये ओबीसी आरक्षण पूर्णपणे शुन्य करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच सतीपांगरा, कीन्होळा,गणेशपुर,सुनेगाव,कौडगाव,कागबन आदी गावांमध्ये ओबीसींसाठी असलेल्या जागांमध्ये कपात करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार,ग्रामपंचायत व वॉर्डनिहाय आरक्षण सोडतीमध्ये ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे.मात्र,निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ५० टक्के आरक्षण मर्यादेचे कारण पुढे करत अनेक ठिकाणी ओबीसींचे प्रतिनिधित्व कमी अथवा शुन्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.हे वर्तन नैसर्गिक न्याय व कायदेशीर तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगुन
या पार्श्वभूमीवर वसमत तालुक्यातील सर्व ओबीसी समाज व संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे तीव्र हरकत नोंदविण्यात आली आहे तसेच ओबीसींवरील हा कथित अन्याय तात्काळ दुर करून पूर्वीप्रमाणे प्रतिनिधित्व कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. आरक्षणातील कपात कायम राहिल्यास ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा तसेच जिल्हाभर जनआंदोलन उभारून न्यायालयीन मार्गाने ओबीसींच्या जागा परत मिळविण्यासाठी संघर्ष छेडण्याचा इशाराही निवेदनातुन देण्यात आला आहे.निवेदनावर समता परिषदेचे अध्यक्ष डॉ.नागोराव जांबुतकर,कुपटीचे सरपंच यशवंत लेकुळे,खांबाळा उपसरपंच महेश होडगीर,खापरखेडा सरपंच कचरु होडगीर,राजवाडी चे तंटामुक्त अध्यक्ष संतोष चव्हाण,मरसुळचे सरपंच संजय होडगीर,कागबनच्या सरपंच सारिका महाजन,विश्वनाथ गवारे,अनंतराव होडगीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या :
लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी आरक्षण कायम ठेवावे.
आरक्षण सोडतीतील कथित पक्षपातीपणाची चौकशी करावी.
ज्या ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षण शून्य करण्यात आले आहे, तेथे आरक्षण पुन्हा लागु करावे.
अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार व जिल्हास्तरीय जनआंदोलन छेडण्यात येईल.














Add Comment