आडगाव शिवारात अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर, हट्टा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
हट्टा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री संदीप बोरकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक :गिरीश देशमुख
हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी पोलीस प्रशासनाला कठोर सुचना दिल्या आहेत.त्या अनुषंगाने हट्टा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री संदीप बोरकर यांनी कारवाई करत आडगाव ता. वसमत शिवारात अवैध वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त करून गुन्हा दाखल केला .
मिळालेल्या माहितीनुसार,हट्टा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार संदीप बोरकर हे दि.२१ जुन रोजी दुपारी ०३ च्या सुमारास आडगाव शिवारात पेट्रोलिंग करत असताना हिरव्या रंगाचे जॉनडियर ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) क्रमांक एमएच-३८-व्ही-५८०९ अवैधरित्या वाळु वाहतुक करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता ट्रॉलीमध्ये अवैधरित्या वाळु वाहतुक होत असल्याचे उघड झाले.
सदर वाळु ही माटेगाव (ता. वसमत) येथील पूर्णा नदीपात्रातुन विनापरवाना उत्खनन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाहतुक केली जात असल्याचे तपासात समोर आले.याप्रकरणी ट्रॅक्टर चालक विकास चकोर याच्याविरुद्ध ठाणेदार संदीप बोरकर यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हट्टा पोलीस ठाणे करीत आहे.अवैध वाळु उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतुन स्पष्ट झाले आहे.














Add Comment