Crime Editor Choice Hingoli police Uncategorized

पोलीसांवर हात उचलणे पडले महागात.सेनगाव पोलीसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या

पोलीसांवर हात उचलणे पडले महागात.सेनगाव पोलीसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या

आरोपी सुदाम चव्हाण आणि राजेश चव्हाण ताब्यात तर इतर दोन आरोपी फरार

तिच्या न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख

सेनगाव प्रतिनिधी- विश्वनाथ देशमुख

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर चालान कारवाई करत असलेल्या पोलीस हवालदाराला चौघांनी मिळुन मारहाण केल्याची खळबळजनक घटना दि.१२ जुलै रविवार रोजी सायंकाळी ५ वाजताच्या घडली आहे.या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन,दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले तर इतर दोन आरोपीचा शोध सेनगाव पोलीस घेत आहेत‌.

पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार,हिंगोली जिल्हाभरात गौणखनिज वाहतुक तसेच अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.त्या आदेशानुसार सेनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अंतर्गत वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली जात असुन यामध्ये वाहनावर कारवाई केली जात आहे.दरम्यान हवालदार जिवन मस्के हे आपल्या सहकाऱ्यासह दि.१२ जुलै रविवार रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गणेशपुर ते हत्ता मार्गावर पिकअप वाहन क्रमांक एम.एच.२२ ए.एन.२२ २२९१ वर कायदेशीर चालान कारवाई करत होते.यावेळी शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या हवालदार मस्के यांना कामापासुन रोखण्यासाठी आरोपींनी संगणमत करून मस्के यांना थापड-बुक्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले.तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी जखमी पोलीस हवालदार जिवन आनंदराव मस्के यांच्या फिर्यादीवरुन आरोपी गजानन वामन चव्हाण,सुदाम वसराम चव्हाण,राजेश सुभाष चव्हाण आणि वामन भुरा चव्हाण सर्व रा.गणेशनगर तांडा ता.जिंतुर जि.परभणी यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या (BNS) शासकीय कामात अडथळ्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहीती मिळताच सपोनि संग्राम जाधव,पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे यांनी घटनास्थळाला भेट दिली.पोलीसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सुदाम चव्हाण व राजेश चव्हाण यांच्या मुसक्या आवळल्या तर लवकरच फरार झालेले आरोपी अटक होतील असे पोलीस सुत्रांकडुन माहीती मिळाली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक रविकिरण खंदारे हे करीत आहेत.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement