Editor Choice Hingoli dist Maharashtra

पावसाने दडी मारल्यामुळे जगाचा पोशिंदा अडचणीत,वसमत तालुक्यात शेतकरी राजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत!

पावसाने दडी मारल्यामुळे जगाचा पोशिंदा अडचणीत,वसमत तालुक्यात शेतकरी राजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत!

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटुन गेला असुन.सुरुवातीला काही ठिकाणी पडलेल्या तुरळक पावसावर समाधान मानत तालुक्यातील शेतकरी राजाने अत्यंत आशेने शेतात पेरण्या उरकल्या.पेरणीनंतरही कुठेतरी एखादी-दुसरी सर बरसली.मात्र,संपुर्ण वसमत तालुक्यात अद्यापही शेतीला जीवदान देणारा पडेलेला नाही त्या मोजक्या पावसाच्या थेंबांवर पुढे नक्कीच चांगला पाऊस होईल,या आशेवर जगाच्या पोशिंद्याने पेरणीचे धाडस केले होते.परंतु,आता गेल्या काही आठवड्यांपासुन पावसाने पुर्णपणे दडी मारली आहे.

गेल्या काही दिवसांपासुन ढगाळ हवामान गायब होऊन कडक ऊन पडत आहे.या वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील कोवळी,छोटी-छोटी पिके आता सुकू लागली असुन त्यांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत प्रचंड भर पडली असुन दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे.

सध्या सोशल मीडियावर विविध हवामान तज्ज्ञ आणि अंदाज वर्तवणाऱ्यांचे मेसेज फिरत आहेत.’अमक्या तारखेपासुन पाऊस पडणार’,’उद्या पाणी पडणार’,’तिकडे मुसळधार होणार’ अशा घोषणा केल्या जात आहेत.मात्र,वसमत तालुक्याच्या बाबतीत हे सर्व अंदाज यंदा पुर्णपणे फेल ठरताना दिसत आहेत.राज्यातील एखाद्या कोपऱ्यात पाऊस पडला की आपलेच अंदाज कसे खरे ठरले,हे सोशल मीडियावर मिरवले जाते,मात्र वसमत तालुक्यातील कोरड्या पडत चाललेल्या चातकासारख्या शेतकऱ्यांकडे कोणाचेही लक्ष नाही,अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.

आता देवावर आणि जुन्या समजुतींवरच भरवसा

सुरुवातीला पावसाने दडी मारल्यानंतर,ग्रामीण भागातील जुन्या जाणत्या पुर्वजांच्या म्हणीनुसार—’पंढरपुरच्या आषाढी यात्रेला गेलेले भाविक ज्यावेळी वारी पुर्ण करून घराकडे परततात,त्यावेळी पाऊस नक्की येतो.’ आता या पारंपरिक आशेवरच तालुक्यातील शेतकरी डोळे लावुन बसला आहे. त्या परमेश्वराला तरी या कष्टाळु बळीराजाची कळकळ यावी आणि वसमत तालुक्यात पावसाच्या सरी बरशाव्यात,अशी प्रार्थना प्रत्येक शेतकरी आणि सामान्य नागरिकांमधुन केली जात आहे.

शासनाने वेगवेगळ्या योजना किंवा तटपुंज्या स्वरूपात मदत करून शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला असला,तरी अन्नदात्याची अपेक्षा वेगळी आहे.”सरकारच्या तुटपुंज्या मदतीपेक्षा माझ्या शेतात माझ्या कष्टाने पिकलेला एक जरी पोता (क्विंटल) दाणा मिळाला,तरी तो माझ्या स्वाभिमानासाठी पुरेसा आहे,” अशी रोखठोक आणि स्वाभिमानी अपेक्षा शेतकरी राजा व्यक्त करत आहे. आता संपूर्ण तालुक्याला प्रतीक्षा आहे ती केवळ एका दमदार पावसाची!

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement