ई-पीक पाहणी संदर्भात वसमत तहसील कार्यालयात तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न.
विहित मुदतीत पीक पाहणी पुर्ण करण्याचे तहसीलदार सारंग चव्हाण यांचे निर्देश
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
दि.२३ सप्टेंबर रोजी वसमत तहसील कार्यालयात तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ई-पीक पाहणी मोहिमेसंदर्भात महसुल व ग्राम प्रशासनाची आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस तालुक्यातील तलाठी,मंडळाधिकारी,पोलीस पाटील तसेच महसुल,कृषी व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत तहसीलदार सारंग चव्हाण यांनी तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक पाहणीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची नोंद करताना येणाऱ्या अडचणी तातडीने दुर करून विहित मुदतीत जास्तीत जास्त शेतजमिनींची पीक पाहणी पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी पीक व पिकांच्या क्षेत्राच्या अचुक नोंदी महत्त्वाच्या आहेत.त्यामुळे तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष उपस्थित राहुन शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे आणि ई-पीक पाहणीच्या कामाला गती द्यावी,असे निर्देश तहसीलदार चव्हाण यांनी दिले.
ई-पीक पाहणी प्रक्रियेत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, तसेच नोंदी अचुक व वेळेत पूर्ण व्हाव्यात,यासाठी महसुल व कृषी विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्या.
यावेळी महसुल व संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते














Add Comment