Celebration • Editor Choice • Social work

सार्वजनिक दसरा महोत्सव प्रदर्शनीचे १३ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या हस्ते उद्घाटन.

सार्वजनिक दसरा महोत्सव प्रदर्शनीचे १३ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या हस्ते उद्घाटन. तहसीलदार सारंग चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती,नागरिकांना उपस्थित राहण्याचे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अवाहन

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक- गिरीष देशमुख 

वसमत शहरातील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ अंतर्गत प्रदर्शनीचे उद्घाटन मंगळवार,दि.१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.या प्रदर्शनीचे उद्घाटन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हस्ते तसेच शहरातील प्रशासनातील अधिकारी,प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दसरा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनीमुळे शहरातील नागरिकांना महोत्सवाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.दसरा हा सण विजय,उत्साह आणि चांगुलपणाचा संदेश देणारा सण म्हणून साजरा केला जातो.या पार्श्वभुमीवर सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असुन,प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे.

या उद्घाटन सोहळ्यास प्रशासकीय अधिकारी,शहरातील प्रतिष्ठित नागरिक,सामाजिक कार्यकर्ते तसेच महोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.दसरा महोत्सवाच्या माध्यमातुन शहरातील नागरिकांना एकत्र आणणे आणि सणाचा आनंद सामुहिकरीत्या साजरा करण्याच्या उद्देशाने समिती प्रयत्नशील आहे.

प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्यास वसमत शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन महोत्सवाची शोभा वाढवावी,असे आवाहन सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement