Editor Choice Good working Vasmat city

विद्युत मंडळाचे अभियंता राजीव नंद यांची नाशिक येथे बदली, कर्मचाऱ्यांतर्फे निरोप समारंभ


विद्युत मंडळाचे अभियंता राजीव नंद यांची नाशिक येथे बदली, कर्मचाऱ्यांतर्फे भावपूर्ण निरोप समारंभ

वसमत | तालुका प्रतिनिधी

वसमत महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता श्री.राजीव नंद यांची त्यांच्या इच्छित स्थळी नाशिक येथे बदली झाल्याने वसमत उपविभागीय विद्युत कार्यालयात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन औंढा नागनाथ येथील प्रभारी उपकार्यकारी अभियंता रणवीर साहेब उपस्थित होते.यावेळी सहाय्यक अभियंता किरण मोरे,मंत्री साहेब, खुडे साहेब,कोकाटे साहेब,मोरकडे साहेब,केंडे साहेब तसेच वसमत उपविभागातील सर्व अधिकारी, अभियंते आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहराचे उपनगराध्यक्ष इमरान अली गुत्तेदार यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावुन श्री.नंद यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी वसमत उपविभाग तांत्रिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा वसमत पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन चव्हाण यांनी श्री.नंद यांच्या कार्यकाळाचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच वसमतचे आमदार राजुभैया नवघरे यांनीही अभियंता श्री.नंद यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.उपस्थितांनी श्री.नंद यांच्या कार्यशैली,कर्मचाऱ्यांशी असलेला स्नेहपुर्ण व्यवहार आणि वीज ग्राहकांसाठी केलेल्या कामांचा गौरव करत त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री.नंद यांनी सर्व अधिकारी,कर्मचारी आणि मान्यवरांचे आभार मानून वसमतमधील सहकार्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील,अशी भावना व्यक्त केली.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement