Editor Choice Maharashtra Social work

कुरुंदा येथे आमदार फंडातुन मंजुर झालेल्या विकासकामांची आमदार राजुभैय्या नवघरे यांनी केली पाहणी

कुरुंदा येथे आमदार फंडातुन मंजुर झालेल्या विकासकामांची आमदार राजुभैय्या नवघरे यांनी केली पाहणी.

मुख्य संपादक: गिरीष देशमुख

वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा येथे आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रयत्नांतुन मंजुर झालेली विविध विकासकामे मार्गी लागली असुन,त्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी दि.१४ जुन रोज रविवार  रोजी आमदार राजुभैया नवघरे यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या पाहणी विकास कामांच्या पाहणी दरम्यान टोकाई गडावरील हेमाडपंती मंदिराच्या बांधकामाची पाहणी करून वीजपुरवठ्यासाठी डी.पी.मंजुरी संदर्भात महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चोंडी रोड ते बाहेरील बसथांबा दरम्यान नाली बांधकाम व रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याची पाहणी करण्यात आली.

याशिवाय बसथांबा ते नदी पुलापर्यंत प्रस्तावित नाली बांधकाम,कॉम्प्लेक्स ते श्रावस्ती नगर नाली बांधकाम तसेच जलसंधारण विभाग व जि.प. योजनेअंतर्गत जुना बसथांबा ते नरहर कुरुंदकर विद्यालयपर्यंत नाली बांधकाम व रस्ता विकासाच्या पूर्ण झालेल्या कामांचीही आमदार नवघरे यांनी पाहणी केली.

या विकासकामांमुळे गावातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असुन नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी आशीर्वाद भैया इंगोले,दत्त रामजी इंगोले पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Featured

Advertisement

Advertisement