Celebration Editor Choice Education

सिद्धेश्वर विद्यालयात शाळेचा पहिला दिवस “प्रवेशोत्सव”दिन म्हणुन उत्साहात साजरा


सिद्धेश्वर विद्यालयात शाळेचा पहिला दिवस “प्रवेशोत्सव”दिन म्हणुन उत्साहात साजरा

मुख्य संपादक: गिरीष देशमुख 

श्री सिद्धेश्वर विद्यालय,वसमत येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त शाळेचा पहिला दिवस ‘शाळा प्रवेशोत्सव’ दिन म्हणुन उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसमतचे प्रतिष्ठित कापड व्यापारी राजाभाऊ कापुसकरी होते.प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा समिती सदस्य तथा प्रतिष्ठित व्यापारी मन्मथ आप्पा बेले,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर तसेच पालक प्रतिनिधी देवराव मगर उपस्थित होते.यावेळी निवृत्त शिक्षक श्री भालेराव सर,प्रकाश इंगळे सर,शास्त्री सर,लंकलवाड सर आणि मन्हाळे सर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.तसेच मार्च २०२६ च्या एस.एस.सी.परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी,एन.एम.एम.एस.परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला.

याशिवाय,सी.ए.पदासाठी निवड झालेले आदेश मगर,महापारेषणमध्ये नियुक्ती मिळालेले मन्मथ पटवे तसेच टेक्निशियन म्हणुन निवड झालेले जगदीश कलंदर या माजी विद्यार्थ्यांचाही विद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर आणि सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कापसे व श्रीमती शिवणकर मॅडम यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री क्षीरसागर सर यांनी केले.

प्रवेशोत्सवाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक वर्षाबाबत उत्साह निर्माण झाला असुन,शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement