Editor Choice Maharashtra Social work

व्हॉईस ऑफ मीडियाची महाराष्ट्र कोअर कमिटी गठित,हिंगोली जिल्ह्यातील संजय बर्दापुरे व गिरीष देशमुख (वसमत )यांचा समिती सदस्य पदी समावेश

व्हॉईस ऑफ मीडियाची महाराष्ट्र कोअर कमिटी गठित,हिंगोली जिल्ह्यातील संजय बर्दापुरे व गिरीष देशमुख (वसमत )यांचा समिती सदस्य पदी समावेश 

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

दिलीप साळुंके,रश्मी भदरगे,सोमनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या प्रश्नांना मिळणार नवी धार

परभणी पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडियाने महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीला नवी दिशा दिली आहे.क्रांती दिनाचे औचित्य साधुन दि.९ ऑगस्ट रोजी परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात महाराष्ट्राची १४ सदस्यीय नवी राज्य कोअर कमिटी गठित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्या संकल्पनेतुन राज्यभरातुन उपस्थित असलेल्या पदाधिकारी व सदस्यांमधुन स्वयंस्फुर्तीने या नव्या कोअर कमिटीची निवड करण्यात आली.राज्यातील पत्रकारांचे प्रश्न,संघटनेचे राज्यव्यापी कामकाज,जिल्हा व विभागीय पदाधिकाऱ्यांमधील समन्वय तसेच पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रभावी भुमिका घेण्याची महत्त्वपुर्ण जबाबदारी या कमिटीवर सोपविण्यात आली आहे.

नाशिकचे दिलीप साळुंके,परभणीच्या रश्मी भदरगे आणि सोलापुरचे सोमनाथ पवार यांच्यावर कोअर कमिटीच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.राज्याच्या विविध भागांत सक्रियपणे कार्यरत असलेल्या अनुभवी पदाधिकाऱ्यांचा समावेश या टीममध्ये करण्यात आल्याने व्हॉईस ऑफ मीडियाच्या आगामी वाटचालीला अधिक संघटित आणि आक्रमक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.राज्य पदाधिकारी यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

या निमित्ताने आयोजित बैठकीमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के,नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयजी चोरडिया,अजितदादा कुंकुलोळ,नरेंद्र देशमुख लोकशाही न्युजचे संपादक विशाल पाटील,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.राज्यभरातील जिल्हाध्यक्ष,विभागीय व राज्य पदाधिकारी तसेच परभणी जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांती दिनी गठित झालेली ही नवी कोअर कमिटी पत्रकारांच्या संघटनात्मक लढ्याला नवी ऊर्जा देणारी ठरणार आहे.पत्रकारांच्या प्रश्नांवर ठोस भुमिका घेण्याबरोबरच राज्यभरातील पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आव्हान या टीमसमोर असणार आहे.त्यामुळे व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्रातील पुढील वाटचालीत या १४ सदस्यीय कोअर कमिटीची भुमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

व्हॉईस ऑफ मीडियाची नवी महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी प्रमुख सदस्य पुढील प्रमाणे

व्हॉईस ऑफ मीडियाच्या नवी महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीमध्ये सोमनाथ पवार (सोलापूर),रश्मी भदरगे (सेलु),दिलीप साळुंके (नाशिक),नागेश कल्याण (नांदेड),गिरीश देशमुख (वसमत),संजय बर्दापुरे (हिंगोली),जय भोसले (सिंधुदुर्ग),रुपेश जाधव (नंदुरबार), गौतम वाघमारे (कल्याण), इरशाद शेख (पुणे),कैलास निधोट (लातुर), सुहास वेताळ (अहिल्यानगर),सय्यद सलीम (पुर्णा) आणि रियाज मुल्ला (कोंढवा) यांचा समावेश आहे. यानिमिताने संदीप काळे (संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष,व्हॉईस ऑफ मीडिया,व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम) म्हणाले की,“ही कोअर टीम केवळ पदाधिकाऱ्यांची टीम नाही,तर महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकाराच्या प्रश्नासाठी उभा राहणारा कृतीशील समुह आहे.पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष,संघटनेची मजबुत बांधणी आणि प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांशी प्रभावी समन्वय हे या टीमचे प्रमुख उद्दिष्ट असेल.नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारताना पदापेक्षा कामाला,व्यक्तीपेक्षा संघटनेला आणि स्वार्थापेक्षा पत्रकारांच्या हिताला प्राधान्य द्या.महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी ही टीम निर्णायक भुमिका बजावेल.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement