Editor Choice Hingoli police Maharashtra

इंजणगाव प्रकरण भोवले,वसमत ग्रामीणचे सपोनी रामदास निरदोडे नियंत्रण कक्षात पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या आदेशाने तडकाफडकी बदली,कळमनुरीहुन उमाकांत पुणे यांची नियुक्ती.

इंजणगाव प्रकरण भोवले,वसमत ग्रामीणचे सपोनी रामदास निरदोडे नियंत्रण कक्षात

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या आदेशाने तडकाफडकी बदली,कळमनुरीहुन उमाकांत पुणे यांची नियुक्ती

दिशा न्युज मराठी २४×७,वसमत

मुख्य संपादक -गिरीष देशमुख 

वसमत तालुक्यातील इंजणगाव ( पश्चिम) येथे मागील काही दिवसांत घडलेल्या पुतळा व झेंडा प्रकरणाची गंभीर दखल घेत हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी रामदास निरदोडे यांची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली असल्याची चर्चा वसमत तालुक्यात ऐकायला मिळत आहेत.ही बदली दि.९ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

काही दिवसांपुर्वी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता मध्यरात्री शासकीय जागेवर झेंडा लावण्यात आल्याने इंजणगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेनंतर प्रशासनाकडुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.

दरम्यान,याच वादग्रस्त जागेवर वसमत ग्रामीण पोलिसांची तात्पुरती पोलीस चौकी असताना अचानक मध्यरात्री लोखंडी अँगल जमिनीत रोवुन सिमेंटच्या साहाय्याने बसवण्यात आले आणि त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवण्यात आला.सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या दोन्ही प्रकरणांमध्ये हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना स्वतः इंजणगाव येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेत मध्यस्थी करावी लागली होती.त्यानंतर प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.

या पार्श्वभुमीवर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी रामदास निरदोडे यांची पोलीस नियंत्रण कक्ष,हिंगोली येथे बदली करण्यात आली असल्याची चर्चा तालुक्यात ऐकायला मिळत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे पोलीस वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

उमाकांत पुणे यांच्याकडे वसमत ग्रामीणची जबाबदारी

रामदास निरदोडे यांच्या जागी कळमनुरी येथुन पोलीस अधिकारी उमाकांत वैजनाथ पुणे यांची वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे आता इंजणगावसह वसमत ग्रामीण परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी उमाकांत पुणे यांच्यावर आली आहे.

इंजणगाव येथील घटनांनंतर प्रशासनाने घेतलेल्या या प्रशासकीय निर्णयाकडे आता स्थानिक नागरिकांचे तसेच पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement