Celebration Editor Choice Good working

व्हॉइस ऑफ मीडिया वसमत शाखेची मराठवाड्यात ‘पहिली’ बाजी!

व्हॉइस ऑफ मीडिया वसमत शाखेची मराठवाड्यात ‘पहिली’ बाजी!

कॅडर कॅम्पमधील पंचसुत्री उपक्रमात प्रथम पारितोषिक,ज्येष्ठ पत्रकार शमीम सिद्दिकी यांचा दिमाखदार सत्कार

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

पत्रकारितेच्या क्षेत्रात संघटनात्मक एकजुट,नियोजनबद्ध कार्य आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटविणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया वसमत तालुका पत्रकार संघाने पुन्हा एकदा आपल्या कार्याची प्रभावी चुणूक दाखवुन दिली आहे.दि. ३० ऑगस्ट रोजी नांदेड येथे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडा कॅडर कॅम्पमध्ये पंचसुत्री कार्यक्रमात वसमत पत्रकार संघाने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा रोवला.

मराठवाड्यातील विविध तालुक्यांमधुन आलेल्या पत्रकारांचा या कॅडर कॅम्पमध्ये सहभाग होता.पत्रकारांची संघटनात्मक ताकद वाढविणे,पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविणे तसेच पत्रकारिता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

या पंचसूत्री उपक्रमात वसमत तालुका पत्रकार संघाने उत्स्फुर्त आणि प्रभावी सहभाग नोंदवत प्रथम पारितोषिक पटकावले. वसमतच्या पत्रकारांनी केलेले नियोजन,एकजुट आणि संघटनात्मक शिस्त यामुळे हा विजय मिळाल्याची भावना उपस्थितांकडुन व्यक्त करण्यात आली.मराठवाड्यातील पत्रकार संघटनांमध्ये वसमत शाखेच्या कार्याची दखल घेतली जाणे ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

ज्येष्ठ पत्रकार शमीम सिद्दिकी यांचा गौरव

दरम्यान,या कॅडर कॅम्पच्या निमित्ताने व्हॉइस ऑफ मीडिया वसमत तालुकाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तथा ‘इमामी न्युज नेटवर्क’चे मुख्य संपादक शमीम सिद्दिकी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष तसेच प्रदेश कार्यकारिणीतील मान्यवरांच्या हस्ते शमीम सिद्दिकी यांचा सन्मान करण्यात आला.

पत्रकारिता क्षेत्रासोबतच पत्रकार संघटन मजबुत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.

वसमत तालुका पत्रकार संघाने मिळविलेले हे प्रथम पारितोषिक केवळ एक पुरस्कार नसुन,पत्रकारांच्या एकजुटीला आणि संघटित कार्यक्षमतेला मिळालेली पावती आहे,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या यशामुळे बेस्ट ऑफ मीडिया शाखा वसमत तालुका पत्रकार संघाच्या कार्याला मराठवाडा पातळीवर नवी ओळख मिळाली असुन,आगामी काळातही पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हा बहुमान स्वीकारतांना व्हॉइस ऑफ मीडिया हिंगोली जिल्हा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष संजय बर्दापुरे व व्हाइस ऑफ मीडिया वसमत माजी तालुका अध्यक्ष प्रमोद नादरे हे उपस्थित होते

Featured

Advertisement

Advertisement