Editor Choice Maharashtra Travel

वेगवान कार उलटल्याने भीषण अपघात,दोघांचा मृत्यू,तीन गंभीर जखमी.

वेगवान कार उलटल्याने भीषण अपघात,दोघांचा मृत्यू,तीन गंभीर जखमी.

जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले.

वसमत ते निळा मार्ग नांदेड रोड वरील मौ.टाकळगांव शिवारात दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारला कार उलटुन झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन जण जखमी झाले असुन जखमींवर वसमत उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार,नांदेडच्या विजयनगर व तरोडा संकुलात राहणारे पाचजन दि.२६ फेब्रुवारी रोजी स्विफ्ट कारमधून परभणी येथे विवाह समारंभासाठी गेले होते.विवाह सोहळा आटोपल्यानंतर सर्वजण परभणीहुन वसमत मार्गे नांदेड कडे जात होते,त्यांची कार वसमत येथून नांदेड रोड वर निळा मार्गे टाकळगाव शिवारात आली असता चालक आशिष भास्करे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण असंतुलित होऊन कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली,त्यानंतर ती कार टिन पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन अडकून पडली कार मधे असलेले इसम गंभीर जखमी झाले.
या अपघातात कारमधील प्रवासी आशिष मनोहर भास्करे (३७),सिद्धांत सोपान सांगवीकर (३०),नितेश शंकरराव खंदारे (३२),आकाश अमृता ढोकणे (२५),अनवेश अशोकराव येडके (३१) हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे,कर्मचारी अंबादास विभुते,नामदेव बेंगाळ,विजय उपरे,यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
पोलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र आशिष भास्करे यांचा मृत्यू झाल्याचे उप जिल्हा रुग्णालय वसमत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.उर्वरित चौघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.मात्र नांदेडला जात असताना नितेश खंदारे यांचा मृत्यू झाला.उर्वरित तिघांवर नांदेड येथे उपचार सुरू असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांच्या व प्रत्यक्षदर्शी च्या सांगण्यावरून कारची अवस्था अतिशय बिकट आहे की,त्यावरुनच अपघात किती भयानक झाला याचा अंदाज येतो.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हते.त्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला नाही.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement