Editor Choice Hingoli dist Maharashtra

२० एप्रिलपासून हेल्मेट सक्ती,नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा – पोलीस अधीक्षक निलाभ रोहन

 

हिंगोली (प्रतिनिधी):

जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी दि.२० एप्रिल पासुन हेल्मेट सक्ती लागु करण्यात आली आहे.हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिला आहे.

सोमवारी शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यशाळेत अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यातून होणारे मृत्यू रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली.या उपक्रमात पोलीस विभाग आणि आरटीओ यांच्या संयुक्त विद्यमाने “हेल्मेट वापरा,आपली सुरक्षा करा” हा संदेश देण्यात आला.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना,स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी मोहन भोसले, शिवसांब घेवारे,आरटीओ अधिकारी राहुल गावंडे,अतुल बानापुरे तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.शहरातील प्रतिष्ठित नागरिक,पोलीस कर्मचारी आणि आरटीओ कार्यालयातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की,हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement