वसमत / तालुका प्रतिनिधी
दि.१ मे रोजी वसमत शहरातील शुक्रवार पेठ परिसरातील पंजा मशीद भागात मुस्लिम समाजासाठी उभारण्यात आलेल्या भव्य शादीखान्याचे लोकार्पण आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी बोलताना आमदार नवघरे म्हणाले की,“विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला दोन वेळा निवडून दिले असुन, विकासकामांच्या माध्यमातून जनतेचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्य आहे.”त्यांनी पुढे सांगितले की,मुस्लिम समाजासाठी माफक दरात उपलब्ध होणाऱ्या शादीखान्याची अनेक वर्षांपासून मागणी होती.सुमारे १ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीतुन ही भव्य आणि सुसज्ज वास्तु उभारण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना बासीत कासमी होते.यावेळी नगराध्यक्षा सौ.सुनिता मनमोहन बाहेती यांचे प्रतिनिधी कन्हैया बाहेती,उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली,माजी नगराध्यक्ष अ.हफीज अ.रहेमान,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन भोसले,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद बडवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातुन आमदार नवघरे यांच्या विकासकामांचे कौतुक केले.तसेच शादीखान्याचे काम उत्कृष्ट दर्जात पूर्ण केल्याबद्दल ठेकेदार खैसर अहमद यांचा सत्कार करण्यात आला.
शुक्रवार पेठ हा बहुसंख्य मुस्लिम बांधवांना परिसर असुन,येथे उभारण्यात आलेला हा शादीखाना सामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार आहे.माफक दरात उपलब्ध होणाऱ्या या सुविधेमुळे गरीब कुटुंबांनाही विवाहसोहळे थाटामाटात साजरे करता येणार आहेत.
या लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
मुस्लिम समाजासाठी बांधण्यात आलेल्या शादीखान्याचे आमदार राजु भैय्या नवघरे यांच्या हस्ते लोकार्पण.













Add Comment