Crime Hingoli dist Hingoli police

हिंगोली जिल्हा पोलिस दलाची कौतुकस्पद कामगिरी,दहा लाखांचे ६० हरवलेले मोबाईल शोधुन मुळ मालकांना केले परत.

मुख्य संपादक :
हिंगोली जिल्हा पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असुन,सुमारे दहा लाख रुपये किमतीचे ६० गहाळ अँड्रॉइड मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांकडे परत करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहण यांनी जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत करण्याबाबत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सायबर सेल तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या.त्यानुसार सायबर सेल हिंगोली व विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नांतुन जिल्ह्यासह इतर जिल्हे आणि परराज्यांतूनही हे मोबाईल शोधण्यात यश आले.
दि.३० मे रोजी आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहण यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले.
यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की,पावती शिवाय सेकंड हँड मोबाईल खरेदी किंवा वापर करू नये.अनेकदा असे मोबाईल चोरीचे किंवा हरवलेले असू शकतात.मोबाईल हरवल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन CER (Central Equipment Identity Register) पोर्टलवर तक्रार नोंदवावी,असेही सांगण्यात आले.
या कारवाईस अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत राजकुमार केंद्रे,उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली कुंदन कुमार वाघमारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच पोलीस निरीक्षक संदीप मोदे,गणेश राहिरे,शामकुमार डोंगरे,सुधीर वाघ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव,विकास आडे,सोमनाथ घार्गे तसेच सायबर सेलचे स.पो.नी.शिवसांब घेवारे,दत्ता नागरे,इरफान पठाण,मारुती काकडे,गणेश लेकुळे,प्रदीप झुंगरे आणि प्रणिता मोरे यांनी मोबाईल शोधून काढण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement