वसमतच्या नगराध्यक्षा सौ.सुनिता मनमोहन बाहेती ‘लोकमत हिंगोली जिल्हा गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय आणि महत्त्वपुर्ण कामगिरी केल्याबद्दल वसमत नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.सुनिता मनमोहन बाहेती यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘लोकमत हिंगोली जिल्हा गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला आहे.या पुरस्कारामुळे त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील योगदानाचा आणि कर्तृत्वाचा मोठा गौरव झाला असुन,संपुर्ण वसमत शहरात आनंदाचे वातावरण आहे.
‘लोकमत माध्यम समुहा’तर्फे हिंगोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय,आदर्श आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी विशेष जिल्हा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.मंगळवार,दिनांक १४ जुलै २०२६ रोजी हिंगोली येथील प्रसिद्ध ‘हॉटेल शांती’ येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्याला जिल्ह्यातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व मान्यवर उपस्थित होते.
सौ.सुनिता बाहेती यांनी नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातुन वसमत शहराच्या विकासात आणि नागरी समस्या सोडवण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे.राजकीय जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत.त्यांच्या याच निरंतर कार्याची दखल घेत लोकमततर्फे त्यांना जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हिंगोली जिल्ह्यातील निवडक आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला.
सौ.सुनिता बाहेती यांना मिळालेला हा पुरस्कार केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसुन ती संपुर्ण वसमतकरांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद बाब ठरली आहे.पुरस्कार जाहीर झाल्याचे आणि तो प्रदान करण्यात आल्याचे समजताच वसमत शहरासह तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष,सामाजिक संस्था,व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांमधुन त्यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे.पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.














Add Comment