वसमत विधानसभा क्षेत्रात नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते गौरव.
दिशा न्युज मराठी २४×७,वसमत
मुख्य संपादक- गिरीष देशमुख
विभागीय स्पर्धा परीक्षेतुन निवड झालेल्या आणि वसमत विधानसभा क्षेत्रात नव्याने नियुक्ती मिळालेल्या सर्व केंद्रप्रमुखांचा सत्कार दि.२१ जुलै रोजी मा.आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या वतीने उत्साहात करण्यात आला.शासकीय विश्रामगृह वसमत येथे हा सत्कार समारंभ पार पडला.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळुन शैक्षणिक दर्जा उंचावणे,शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि संपुर्ण वसमत विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साधणे,हा या स्पर्धा परीक्षेमागील मुख्य उद्देश आहे.याच उद्देशाला समोर ठेवुन नवनियुक्त केंद्रप्रमुखांचे मनोबल वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात वसमत विधानसभा क्षेत्रातील विविध केंद्रांवर नियुक्ती मिळालेल्या पुढील नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला:
सुनिल अनकाडे (केंद्रप्रमुख,कन्या शाळा वसमत)
श्रीनिवास कोल्हाळे (केंद्रप्रमुख,शाखा शाळा वसमत)
अमोल भारती (केंद्रप्रमुख,नुतन शाळा)
संतोष कोंपलवार (केंद्रप्रमुख,कुरंदा केंद्र)
कमलकिशोर कुलकर्णी (केंद्रप्रमुख,हट्टा केंद्र)
सुरेश वाघमारे (केंद्रप्रमुख,नहाद केंद्र)
यादव गायकवाड (केंद्रप्रमुख,उंडेगाव केंद्र)
सय्यद सादेक (केंद्रप्रमुख,पुरजळ केंद्र)
याप्रसंगी बोलताना आमदार राजुभैय्या नवघरे यांनी नवनियुक्त केंद्रप्रमुखांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.”क्षेत्रात काम करताना सर्व कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा व प्रेरणा मिळावी आणि माझ्या मतदारसंघाच्या विकासामध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याचा सक्रिय व प्रामाणिक सहभाग असावा,”अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या सत्कार समारंभास तालुक्यातील राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,शिक्षक पतसंस्थेचे सर्व सन्माननीय संचालक आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Add Comment