वसमतमध्ये धक्कादायक प्रकार, कत्तलीच्या उद्देशाने गोवंश कोंडल्याप्रकरणी शेतावर पोलिसांचा छापा गुन्हा दाखल.
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख
वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा-खंदारबन परिसरातील एका शेतावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कत्तलीच्या उद्देशाने क्रुरपणे बांधुन ठेवलेला मोठा गोवंश जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन,संबंधित शेत वसमत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा सत्ताधारी पक्षाचे शहरातील नेते सय्यद इम्रान सय्यद नाशेरअली यांचे असल्याचे पोलिसांच्या कागदपत्रांवरून समोर आल्याने शहरासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वसमत ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि.२९ जुलै २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा-खंदारबन शिवारातील गट क्रमांक ३२ मधील शेतावर छापा टाकण्यात आला.पोलिसांच्या माहितीनुसार,या शेतात चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीच्या उद्देशाने एकुण १९ जनावरे क्रुरपणे बांधुन ठेवण्यात आली होती.यामध्ये गायी,बैल,गोरे व कारवडींचा समावेश असुन,या जनावरांची अंदाजे किंमत ₹ १ लाख ६३ हजार इतकी असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरिफ बशीर दोसानी पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम,१९९५ मधील कलम ५(अ),५(क),९ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम,१९६० मधील कलम ११(१)(i)(h) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हा गुन्हा दि.३० जुलै २०२६ रोजी मध्यरात्री नोंदविण्यात आला असुन, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे आणि पोलीस हवालदार विजय उपरे करीत आहेत.
या घटनेनंतर तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले असुन,अफवा पसरू नयेत यासाठी पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केल्याची माहिती मिळाली आहे.शेतामध्ये पंचनामा करून पुरावे संकलित करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.श्रेनिक लोढा,प्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे,पोलीस उपनिरीक्षक डक,विजय उपरे,बशीर दोसानी,साहेबराव चव्हाण,राठोड व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.














Add Comment