वसमत येथील जय दुर्गा उत्सव,नगरेश्वर मंदिर समितीतर्फे बारा ज्योतिर्लिंगांचा भव्य देखावा.
नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद,धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत
वसमत शहरातील मंगळवार पेठ परिसरातील जय दुर्गा उत्सव, नगरेश्वर मंदिर समितीच्या वतीने बारा ज्योतिर्लिंगांचा भव्य आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.या देखाव्याला शहरातील नागरिकांकडुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असुन,दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
नगरीश्वर मंदिर हे वसमत शहरातील पुरातन मंदिरांपैकी एक असुन,या मंदिराला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे.वसमत नगरीतील प्रथम मानाच्या दुर्गा उत्सवाची स्थापना करणारे मंडळ म्हणुन या समितीची ओळख असल्याची मान्यता आहे.अनेक वर्षांपासुन उत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यावर्षी बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारून भाविकांना एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची अनुभूती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या देखाव्याच्या माध्यमातुन धार्मिक श्रद्धा,भारतीय संस्कृती आणि परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच सामाजिक प्रबोधनासोबतच नव्या पिढीला भारतीय धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणे,हा देखावा उभारण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे दिसुन येते.
हा भव्य देखावा साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.देखाव्याची आकर्षक मांडणी,बारकाईने केलेली सजावट आणि धार्मिक वातावरण यांमधुन कार्यकर्त्यांच्या परिश्रमांची प्रचिती येत आहे.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांमुळे हा देखावा भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे.
धार्मिक उत्सवाच्या माध्यमातुन सामाजिक एकोपा,सांस्कृतिक जतन आणि धार्मिक जागृतीचा संदेश देण्याचे काम जय दुर्गा उत्सव समिती,नगरेश्वर मंदिर करत आहे.बारा ज्योतिर्लिंगांच्या या भव्य देखाव्यामुळे वसमत शहरातील दुर्गोत्सवाच्या उत्साहात भर पडली असुन,नागरिकांकडुन मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.














Add Comment