वसमत येथे राज्यमाता–गोमाता संवाद यात्रेचे उत्साहात स्वागत,गोशाळांनी ‘गो-उद्यम’ मॉडेल स्वीकारून स्वावलंबनाकडे वाटचाल करावी – शेखरजी मुंदडा.
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक:गिरीष देशमुख वसमत
महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यमाता–गोमाता संवाद यात्रा दि.२९ जुन रोजी वसमत शहरात उत्साहात दाखल झाली.माळवटा येथील बाफना ट्रेडर्स येथे गोसेवाप्रेमी शितल बाफना,राधेश्याम मंत्री,अभय जैन,अशोक अडकिने,संजीव बेंडके,राजु सिद्दिकी तसेच लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड यांच्या वतीने यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी गाय व वासरासह पायी दिंडी काढण्यात आली.भजन,नामस्मरण आणि जयघोषाच्या वातावरणात दिंडी सभामंडपात पोहोचल्यानंतर गोमातेची विधिवत आरती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाशजी मुंदडा होते.प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा,आयोगाचे सदस्य डॉ.सुनील सुर्यवंशी व उद्धव नेरकर,महा एनजीओ फेडरेशनचे वरिष्ठ संचालक मुकूंद आण्णा शिंदे,राज्यमाता–गोमाता संवाद यात्रेचे मुख्य सारथी नितीन चिलवंत,वसमतच्या नगराध्यक्षा सौ सुनीता मनमोहन बाहेती,शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार,माजी उपनगराध्यक्ष सिताराम मॅनेवार,नगरसेवक शिवाजी अडलिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर डॉ.जयप्रकाश मुंदडा व नगराध्यक्षा सौ सुनीता बाहेती यांनी मनोगत व्यक्त केले.
मार्गदर्शन करताना महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा म्हणाले,”गोशाळा केवळ दानधर्मावर चालणाऱ्या संस्था न राहता त्या ‘गो-उद्यम’ म्हणून विकसित होणे ही काळाची गरज आहे.गोमूत्र, शेणखत,जैविक उत्पादने आणि पंचगव्य निर्मिती यांसारख्या उपक्रमांमधुन गोशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनू शकतात. गोसेवकांना शासनामार्फत आवश्यक प्रशिक्षण,विमा संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी आयोग सातत्याने प्रयत्नशील आहे.गोवंश संवर्धन ही केवळ धार्मिक भावना नसुन पर्यावरण संरक्षण,सेंद्रिय शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी लोकचळवळ आहे. प्रत्येक गावात गोसेवा आणि गोसंवर्धनाची चळवळ उभी राहिली,तर ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे अध्यक्ष राजु सिद्दिकी,संजीवकुमार बेंडके,बाळासाहेब बेले,कल्याण कुरुंदकर,अशोकराव आडकिने तसेच सर्व गोसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत गोसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागाची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब बेले यांनी केले.














Add Comment