Editor Choice Social work Vasmat city

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आगळीवेगळी मानवंदना

मुंढे परिवार वसमत यांचा आदर्श दायी उपक्रम.
वसमत / तालुका प्रतिनिधी
दि.१४ एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस जमादार प्रशांत नागोराव मुंढे यांनी आपल्या सहपरिवारासह मौजे पळसगाव ता.वसमत येथील एका वृद्धाश्रमात जाऊन अन्नदानाचा उपक्रम राबविला.
यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांनी जयंती साजरी करत त्यांना सन्मानपूर्वक भोजन दिले.तसेच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत मानवी मूल्यांचा आदर्श घालून दिला.या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होत असून,इतरांनीही यापासून प्रेरणा घ्यावी,असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement