Articles Editor Choice Maharashtra

‘विकसित भारत २०४७’ दिशादर्शक परिषदेत आमदार राजुभैया नवघरे यांचा सहभाग

वसमत / तालुका प्रतिनिधी
गोवा येथे आयोजित काॅमनवेल्थ पार्लियामेंटरी असोसिएशन (CPA) इंडिया रिजन झोन-७ पश्चिम विभाग परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने वसमत विधानसभेचे आमदार राजुभैया नवघरे यांनी आनंद व्यक्त केला.ही संधी आपल्या सार्वजनिक जीवनातील अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
दि.८ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान झालेल्या या परिषदेत ‘विकसित भारत २०४७’या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी विविध विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.लोकशाही अधिक सक्षम करत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असल्यावर विशेष भर देण्यात आला.
या परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,राज्यसभा उप सभापती हरिवंश नारायण सिंह,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,गुजरात विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी,आंध्रप्रदेश विधानसभा अध्यक्ष अय्यन्नापात्रुडु साहेब,कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यु.टी.खाडेर, हरियाणा विधानसभा अध्यक्ष,श्री अरविंद कल्याण साहेब,गोवा विधानसभा उपसभापती जोशवा डिसुजा साहेब,महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीराम शिंदे साहेब,महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोरे गोवा आणि महाराष्ट्रातील आमदार उपस्थित होते तसेच विविध राज्यांतील विधानसभा अध्यक्ष,उपसभापती आणि आमदार उपस्थित होते.
परिषदेत डिजिटल परिवर्तन,पारदर्शक शासन,तसेच जनतेशी थेट संवाद यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळू शकते,यावर एकमत व्यक्त करण्यात आले.तसेच पश्चिम भारतातील व्यापार,पर्यटन,शहरी विकास,पर्यावरण संवर्धन आणि किनारपट्टी कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांतील संधी व आव्हानांवरही सविस्तर चर्चा झाली.
यावेळी आमदार राजुभैया नवघरे यांना‘विकसित भारत २०४७’ या विषयावर आपले विचार मांडण्याची संधी मिळाली.त्यांनी वसमत मतदारसंघातील अनुभव आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपक्रमांविषयी उपस्थितांसमोर भूमिका स्पष्ट केली.
विविध राज्यांतील यशस्वी उपक्रमांची देवाणघेवाण आणि लोकहिताच्या निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता यामुळे‘सक्षम लोकशाही – सक्षम भारत’ या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी ही परिषद मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
‘विकसित भारत २०४७’चा संकल्प अधिक दृढ करत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अशा परिषदांमधून प्रेरणा आणि नवी ऊर्जा मिळते,असेही आमदार नवघरे यांनी नमूद केले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement