Editor Choice Hingoli dist Social work

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान २०२६

मा.माननीय जिल्हाधिकारी महोदय हिंगोली यांच्या निर्देशाखाली व माननीय माननीय उपविभागीय अधिकारी वसमत विकास माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ हयातनगर अंतर्गत सातेफळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा १ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद डोणगावकर नायब तहसीलदार यांनी केले.त्यांनी प्रशासनाची या शिबीरा मागचा उद्देश आणि भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमात विविध प्रमाणपत्रे त्यामध्ये जात,राहिवाशी,उत्पन्न आणि वय व अधिवास इत्यादी चे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
कलम १५५ अंतर्गत ७/१२ दुरुस्ती करून त्याचेही वाटप करण्यात आले.
जिवंत ७/१२ अभियाना अंतर्गत वारसा नोंदी घेऊन ७/१२ व फेरफार वाटप करण्यात आले.मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी ७/१२ जिवंत करून घेण्याकरीता आवाहन केले.
पुरवठा विभाग वसमत यांचेकडून पात्र लाभार्थ्यांना राशन कार्ड चे वाटप करण्यात आले.
संगायो व श्राबायो योजनेतर्गत पात्र लाभार्थी मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले आणि योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
महिला व बालकल्याण विभागाकडून प्रसूती पश्चात लाभार्थ्यांना baby kit चे वितरण करण्यात आले.लेक लाडकी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
शालेय विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर उस्फुर्त भाषणे केली.
मा.काळे सर तालुका आरोग्य अधिकारी वसमत यांनी आरोग्यविषयक विविध योजनेची माहिती देऊन विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मा. विकास माने उपविभागीय अधिकारी वसमत यांनी अध्यक्षीय समारोप करून सखोल मार्गदर्शन केले.त्यामध्ये मुख्य करून शेताकडे जाणारे रस्ते कुणीही अडवू नये.अडवल्यास प्रशासनाकडून आपल्याला कोणताच शासकीय लाभ मिळणार नाही असे बजावून सांगितले.
ई पीक पाहणी करताना शेतात आहेत त्याच पिकांच्या नोंदी मोबाईल app द्वारे कराव्यात असे सांगून भुसंपादन प्रकरणात होणाऱ्या संभाव्य नुकसानीची कल्पना स्पष्ट करून सांगितली.
याचसोबत N.A.बाबत शासन निर्णयावर प्रकाश टाकला व NA ची जटिल प्रक्रिया रद्द करून शासनाने आणलेल्या नवीन करप्रणाली बाबत मार्गदर्शन केले.
तसेच गायरान जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनाची भूमिका मांडली.
अशाप्रकारे महसूल संबंधित १५ प्रकारच्या सेवा सह विविध विभागाच्या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती क्षीरसागर व सुधीर इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मयुरी चौतमल मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी गावचे आजी माजी सरपंच,ग्रामसेवक,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष,चेअरमन,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,जि प प्रा शाळा चे मुख्याध्यापक,सर्व ग्राम महसूल अधिकारी,कृषी सहाय्यक,महसूल सेवक आणि मंडळ अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement